कु. रोहन मकासरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

कु. रोहन मकासरे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
– राहुरी तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा कुक्कडवेढे शाळेचा विद्यार्थी कु. रोहन बापूसाहेब मकासरे याची इयत्ता पाचवी मधून जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
त्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री मरभळ सर, वर्गशिक्षिका व मार्गदर्शिका श्रीमती पुरी सुनिता (गोसावी) मॅडम तसेच श्री वने सर, श्री वाघ सर, श्री गोसावी सर,श्रीम. रजपूत मॅडम,श्रीम.मुजावर मॅडम,श्रीम.साखरे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले व त्याच्या आई- वडील, आजोबा यांचे प्रोत्साहन मिळाले.त्याच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री अर्जुन गारूडकर साहेब,केंद्रप्रमुख श्री रविंद्र थोरात साहेब, सरपंच श्री दिपक मकासरे, उपसरपंच सौ.अर्चनाताई बाबासाहेब पानसरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ.पूजा सोनवणे व पदाधिकारी तसेच शिक्षण प्रेमी श्री बाळासाहेब तिडके, श्री रमेश चोथे, श्री.गणेश दत्तात्रय तिडके, श्री.गणेश गीताराम तिडके, माजी सरपंच श्री देवीदास मकासरे, श्री अमोल गव्हाणे,श्री ज्ञानदेव ढेसले, श्री किशोर काचोळे तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून त्याचे अभिनंदन करण्यात आले.