साखर कारखानदारीतील अंतराची अट रद्द झाल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत :- रघुनाथदादा पाटील.

साखर कारखानदारीतील अंतराची अट रद्द झाल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत :- रघुनाथदादा पाटील.
कारेगाव ता. श्रीरामपूर येथे शेतकरी कृतज्ञता सभा
श्रीरामपूर : दोन साखर कारखान्यांमधील २५ किमी. हवाई अंतराच्या अटीमुळे साखर कारखानदारीतील व्यावसायिक स्पर्धा थांबली असून, हा उद्योग ठराविक लोकांच्या हाती एकवटल्याने मक्तेदारी निर्माण होऊन ऊस उत्पादकांना हवे तसे लुटले जात आहे. उत्तर प्रदेश, गुजरात प्रमाणे उसाचा भाव मिळवायचा असेल तर दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी ताकदीने एकत्र येण्याची आवश्यकता आहे, तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भविष्यात चांगले दिवस येतील असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.
प्रसाद शुगर(राहुरी) कारखान्याने सन २०१८-१९ गाळप हंगामात श्रीरामपूर, नेवासा भागातील शेतकऱ्यांना प्रति टन २२१/- रुपये कमी भाव दिला होता. फरकाची ऊस बिले मिळवण्यासाठी ऊस उत्पादकांनी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे यांचे नेतृत्वाखाली सलग चार वर्षे केलेल्या संघर्षामुळे साखर आयुक्तांनी फरकाची ऊस बिले एकसमान पद्धतीने अदा करण्याचे नुकतेच आदेश दिले. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांनी आयोजित केलेल्या शेतकरी कृतज्ञता सभेस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, राज्य ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, राज्य प्रसिध्दी प्रमुख पंकज माळी,शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापराव पटारे, शिवाजीराव कवडे, राहुरी ता.अध्यक्ष नारायणराव टेकाळे, उपाध्यक्ष अमोल मोढे, श्रीरामपूर ता.उपाध्यक्ष राजेंद्र कदम, युवा आघाडीचे उपाध्यक्ष संदीप उघडे, राजेंद्र टेकाळे, अशोकराव टेकाळे, विश्वास पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना संबोधित करताना श्री.पाटील पुढे म्हणाले की, उसाचा एफआरपी हा किमान दर असून, डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ऊसापासून तयार होणाऱ्या सर्व उत्पादनांच्या ७० टक्के हिस्साप्रमाणे आरएसएफ नुसार ऊसाला भाव मिळाला पाहिजे.आरएसएफ चे सूत्र ऊसासह कापूस,दूध,सोयाबीन पिकाच्या भावासाठीहि लागू झाले पाहिजे. सत्ताधारी व विरोधी पक्ष आलटून पालटून शेतकऱ्यांना फसवीत आले आहेत हे ओळखून यापुढे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईला पाठबळ द्या, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी प्रसाद शुगरचे आंदोलन चिकाटीने व निर्धारपूर्वक यशस्वी केल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ऊस आंदोलक शेतकऱ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. यावेळी ऊस आंदोलन समितीचे संजय नामदेवराव उंडे, साहेबराव पा. पटारे, मारूतराव पा. पटारे, संजीव रायभान उंडे, श्रीकृष्ण वेताळ, नामदेवराव गायके, वाल्मीकराव भोसले, योगेश उंडे, काशिनाथ शिरोळे, राहुल उंडे,रमेश पटारे सर, बापूसाहेब पटारे, आप्पासाहेब पटारे, संजय जोशी आदी आंदोलक शेतकऱ्यांचा श्री.रघुनाथदादा पाटील यांनी सत्कार केला. ऊस आंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाचे नेते बाळासाहेब पटारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेच्या कारेगाव शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी शेतकरी संघटनेच्या कारेगाव शाखेचे अशोकराव पटारे, मनोज हेलवडे, जयदीप पटारे, सुनील तऱ्हाळ, लक्ष्मणराव साळवे, सोपानराव गोरे, विकास बोरुडे,संजय इंगळे सर, कानिफनाथ चव्हाण, तसेच मच्छिंद्र पा.भवार,भाऊसाहेब पा. उंडे,रामदासमामा पटारे, कुंडलिकराव पटारे, निळकंठ पा.उंडे, छबुमामा गोरे, प्रा. बी. वाय. पटारे सर,अनिलराव कहांडळ, धनंजय पटारे, रखमाजी भवार, पोलीस पाटील नानासाहेब बार्से, दत्तात्रय जानराव,ज्ञानदेव पा.पटारे,प्रल्हाद पटारे, भाऊदास बार्से,योगेश पवार, नानासाहेब गोरे, राजेंद्र भिंगारे, सुभाष कौठाळे, अमरचंद पठाण, चित्तरंजन गोरे, अशोकराव काळे, प्रमोद लिपटे, सुनील उंडे, रमेश भारत, बिलाल पठाण, माधव शितोळे, संजय काकडे, गोरख खाडे, अंबादास ढाकणे, हसन पठाण आदी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.