आढळगाव गटातून विजय शेंडे उमेदवारी चे खरे दावेदार

आढळगाव गटातून विजय शेंडे उमेदवारी चे खरे दावेदार
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक गट व गण रचना जाहीर झाल्याने अनेक दिग्गज नेते आपली ताकद पणाला लावून उमेदवारी करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.आढळगाव गटातून नेहमी आनंदवाडी येथून उमेदवारी होत होती परंतु आता नवीन प्रभाग रचनेनुसार आनंदवाडी गाव तुटल्याने आता उमेदवार कोण? असे चर्चेला उधाण असतानाच शेडगाव सरपंच विजय शेंडे हे आढळगाव गटासाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा परीसरात होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील महाराष्ट्र राज्य कृषी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या हाताला धरून राजकारणात प्रवेश करणारे विजयराव शेंडे यांनी सरपंच पदाची कामगिरी अगदी दिलखुलास बजावली असल्यामुळे त्यांची सरपंच परिषद चे अध्यक्ष हे पद भूषविले तर सरपंच पद भूषवत गावचा सर्वांगीण विकास केला असून त्यामुळे गावातील जनता त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खुश आहे मात्र नवीन झालेल्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषद गटामध्ये आनंदवाडी गाव वगळले असून आता आढळगाव गटाचे नेतृत्व करणार कोण अशी खुलेआम चर्चा होत असताना एक उभरते नेतृत्व शेडगाव या ठिकाणी झाले आहे.
आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल
त्यामुळे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत दमदारपणे इंट्री मारून विजयासाठी मोठ्याप्रमाणात रस्सीखेच करणार असल्याची सर्वसामान्य नागरिकांमध्ये विजयराव शेंडे यांच्या नावाची चर्चा खुल्या होताना दिसत आहे.
आतापर्यंत केलेले राजकारण राजकारणातून केलेला विकास विकासातून झालेली जनतेची कामे याचा सर्व कौल जनता विजयराव शेंडे यांना देणार असल्याची खुलेआम चर्चा आहे तरी जिल्हा परिषदेसाठी विजयराव शेंडे यांनी जोरदार तयारी केले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आढळगाव गटातील सर्व तरुणांच्या तोंडून आता उमेदवारी फक्त विजयराव शेंडे यांना दिली जाईल असे बोलले जात आहे.