मुल्ला कटर वर दाखल केलेला गुन्हा मागे घे म्हणत नुकत्याच जामीनवर सुटून आलेल्या व्यक्तींकडून मारहाण

अल्पवयीन मुलीचे धर्मांतर करून अत्याचार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुल्ला कटर विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घे म्हणत पुणे बॉंबस्फोटातील आरोपीना मदत केल्याच्या आरोपाखाली दहशतवादी पथकाच्या कारवाईच्या अटकेतून नुकताच बाहेर आलेला बंटी जहागीरदार व त्याच्या गँगने मारहाण केल्याच्या महिलेच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे.*
शहरातील बोरावके कॉलेज जवळील सिध्दार्थनगर येथे राहत असलेली महिला सुलोचना उत्तम परजाने हिने दि.२४ एप्रिल रोजी घडलेल्या घटनेच्या फिर्यादीत म्हंटले आहे की, सिध्दार्थनगर वार्ड नंबर एक याठिकाणी माझी बहिण तिचे दोन मुलं सोनू साबळे,अमोल साबळे यांच्यासह राहत आहोत,वार्ड नंबर दोन याठिकाणी असलेले घर विकायचे असल्याने त्याठिकाणी मी व भाचा सोनू साबळे दोघे वार्ड नंबर दोन मधील आमच्या घरी गेलो असता त्याठिकाणी बंटी जहागीरदार हा त्याच्या मोठ्या जमावासह आला व त्याने मला व माझा भाचा सोनू साबळे यास दमबाजी करण्यास सुरवात केली,मुल्ला कटर विरोधात केलेली तक्रार मागे घे नाहीतर तुम्हाला दोघांना आम्ही मारू.मुल्ला कटर विरोधात मी दिलेली तक्रार मागे घेण्यास मी विरोध केल्यानंतर बंटी जहागीरदार याने माझ्या मुस्काडीत मारली व मारहाण करण्यास सुरुवात केली तेंव्हा घाबरून माझा भाचा सोनू हा तेथून पळायला लागला तेंव्हा बंटी जहागीरदार बरोबर आलेले जाफर,सलमान,शाहरुख, गुल्लू,शरफया बाबा,आशु,रिजवान,अय्याज यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले व त्याला लाकडी दांडके, लोखंडी रॉड ने खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली.तेंव्हा मी घाबरून तेथून स्वतःचा जीव वाचवून पळून सिध्दार्थनगर येथे आले.त्यानंतर माझी बहिण मीरा(सोनूची आई) व सोनूची बायको आम्ही तिघी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.घटना समजल्यानंतर राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी तात्काळ या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.आशा गंभीर संतापजनक प्रकरणात राष्ट्रीय श्रीराम संघ तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्या महिलेला दिल्याने तिला पोलीस ठाण्यात जाऊन बंटी जहागीरदार व त्याच्या गुर्ग्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे आत्मिक बळ भेटले.
बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केली म्हणून दहशतवादी पथकाने कारवाई केलेला बंटी जहागीरदार याची शहरात व मुस्लिम मोहल्ल्यात दहशत वाढली असून अटकेतून बाहेर आल्यानंतर त्याच्या गुर्ग्यांची डेरिंग दिवसेंदिवस वाढत चालली असून कोणतीही मोठी घटना घडण्या अगोदर या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.