सोनई पोलीसांनी विविध गुन्ह्यातील अकरा आरोपी केले जेरबंद.

सोनई पोलीसांनी विविध गुन्ह्यातील अकरा आरोपी केले जेरबंद.
सोनई पोलिसांची दमदार कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार nbw/bw वारट बजावनी या विशेष मोहिमे अंतर्गत सोमवारी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दि 12 रोजी nbwचे सहा आरोपींना अटक करण्यात आली तसेच bwमधील 13वारटची बजावणी करण्यात आली त्याचबरोबर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र न 124/2023भा द वी कलम 326, 324,143,147मधील 18 मार्च2023 पासुन फरार असलेले पाच आरोपींना अटक करण्यात आली असे एकुण 11 आरोपींना आज अटक करण्यात आली सदर ची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सुरेश पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पी एस आय राजेंद्र थोरात हेड कॉन्स्टेबल प्रविण आव्हाड अंकुश दहिफळे,दता गावडे, मच्छिंद्र अडकिते,पो काॅस्टेबल विठ्ठल थोरात,अमोल जवरे, मृत्युंजय मोरे, महेंद्र पवार ज्ञानेश्वर आघाव यांनी ही कामगिरी केली