निसर्गनिर्मित असलेले अन्न मुलांना द्यावे….शोभा शिंदे

निसर्गनिर्मित असलेले अन्न मुलांना द्यावे….शोभा शिंदे
टाकळीभान प्रतिनिधी : माता भगिनींनी आपल्या मुलांच्या आहाराकडे लक्ष देऊन त्यांना निसर्गनिर्मित अन्न द्यावे, व कृत्रिम अन्न देऊ नये असे प्रतिपादन टाकळीभान येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प विद्यमाने आयोजित पोषण महाअभियान कार्यक्रम २०२३प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी शोभा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करून किशोरी देवींचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चनाताई रणनवरे होत्या. तसेच व्यासपीठावर उपसरपंच कान्हा खंडागळे, भाऊसाहेब पवार, ग्रामसेवक रामदास जाधव, शितल शेळके,ग्रा. सदस्य सौ. अर्चनाताई पवार ,सौ दिपालीताई खंडागळे, सिस्टर वंदना शेळके, बडाख मॅडम, कासार मॅडम ,गव्हाणे मॅडम, कल्पना फासाटे मॅडम आदी उपस्थित होत्या.
यावेळी शिंदे बोलताना पुढे म्हणाल्या बाल वयातच मुलांचा खरा विकास होत असून त्यांना पॅकिंग फूड देऊ नये व त्यांच्या आहाराची माता भगिनींनी काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.
यावेळी शितल हिवाळे मॅडम यांनी माता व शिशु पोषण आहारा निमित्त महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी चि.रुद्रप्रताप संतोष खंडागळे याच्या वाढदिवसानिमित्त पोषण तुला कार्यक्रम पार पडला यामध्ये तालुक्यातील कुपोषित मुलांसाठी ५० किलोचा पोषण आहार प्रदान करण्यात आला. या दातृत्वाबद्दल उपसरपंच कान्हा खंडागळे यांचे अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी शिंदे मॅडम यांनी आभार मानले.
याप्रसंगी सौ. रंजना अजित डुकरे यांचा ओटी भरण कार्यक्रम पार पडला. तसेच अन्यप्राशन कार्यक्रमाचा कु. पिंकू मुस्ताक पठाण हिस मान मिळाला. यावेळी सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फिजा मुश्ताक पठाण,अवंती अभिजित लांडगे, ओजस हौशीराम माने, आदींनी अनुक्रमे क्रमांक पटकावले त्यासाठी टाकळीभान अंगणवाडी पर्यवेक्षिका खेडकर मॅडम यांनी बक्षीस दिले. त्याचप्रमाणे पोषण मटका, आहार प्रात्यक्षिक, हाट बाजार या ठिकाणी मान्यवरांनी भेटी देऊन अंगणवाडीतील चिमुकलांचे कौतुक केले. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी काही चिमुकल्यांनी धमाल नृत्य सादर केले, त्याचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून दाद दिली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभानच्या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध लेझीम पथक सादर केले. असं विविध उपक्रम साजरे करून एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पोषण महाअभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी टाकळीभान पर्यवेक्षिका खेडकर ए.पी. मॅडम, संगीता जोशी, छाया लांडगे, अर्चना मावळे, कल्पना कोकणे, रेखा कणसे , मंगल जाधव,सविता कांबळे, चंद्रकला चव्हाण ,अनिता मुरकुटे, अलका महावीर,कविता कोकणे, मीरा गवांदे, गायकवाड मॅडम यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी तीलोतमा शिंदे, सुरेखा माने ,आशा तगरे ,सीताबाई दुशिंग कविता लोखंडे, सुनीता शिरसाठ, कविता कांबळे आदी सह श्रीरामपूर तालुक्यातील सर्व गटातील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,पालक माता भगिनी, शिक्षक शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद आनंद घेतला.