टाकळीभान येथे दोन दुकाना आगीत 25 ते 30 लाखाचा माल जळून खाक

टाकळीभान येथे दोन दुकाना आगीत 25 ते 30 लाखाचा माल जळून खाक
टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथील जुनी ग्रामपंचायत समोर असलेले टाकळीभान घोगरगाव बाजारपेठेतील व्यावसायिक अशोक तऱ्हाळ यांचे आनंद जनरल व सिद्धेश्वर महावीर यांचे महावीर ड्रेसेस जनरल स्टोअर व कापड गोडाऊन दुकानास रात्री दोन ते तीन दरम्यान भीषण आग लागली या आगीचा लोन एवढा मोठा होता की जनरल स्टोअर व कापड गोडाऊन दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले.दोन्ही दुकाना शेजारी असल्याने आगीने दोन्ही दुकानाची राख झाली. पहाटे चार वाजता अग्नि शामन व्यवस्थेचे पाचारण करण्यात आले, तोपर्यंत दोन्ही दुकाने जळून खाक झाली होती परंतु त्या शेजारी असणारे दुकाने पेटण्याचा अनर्थ टाळला. या नुकसानीमुळे वर्ष दोन वर्षांपूर्वीच सुरू झालेले तऱ्हाळ यांचे जनरल स्टोअर चे सहा सात लाखाच्या मालाचे नुकसान झाले असून, गावातील होतकरू व्यापारी महावीर यांचे दुकानास लागलेल्या भीषण आगीने 25 ते 30 लाखाचे मालाचे मोठे नुकसान झाले आहे. टाकळीभान मधील ही आत्तापर्यंत जळीताने झालेली सर्वात मोठी हानी असून या दोन्ही व्यवसायिकांच्या पूर्ण दुकानात उध्वस्त झाल्या आहेत.या घटनेबद्दल गावातील व्यावसायिक व ग्रामस्थ सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.