राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियानचा अहमदनगर जिल्हा दौरा संपन्न

राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियानचा अहमदनगर जिल्हा दौरा संपन्न
राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्यमहासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्यामार्गदर्शनाखाली युवकांचे नेते पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष युवा जोडो संकल्प अभियान दौऱ्याची सुरवात 5 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मगाव चोंडी जिल्हा अहमदनगर या प्रेरणा स्थळापासून झाली जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर, या 14 तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तरुण युवक यांच्याशी पश्चिम महाराष्ट्र युवाध्यक्ष अजित पाटील यांनी संवाद साधत असताना तरुणांचे बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या, महागाई आणि ओबीसी चे राजकीय अस्तित्व या बाबींवर तरुणांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कोणी भोंगे कुठ लावावे तर कोणी हनुमान चालीसा कुठे वाचावी तर कोणी ईडी कुठं लागणार याची चर्चा करतंय राज्यतल्या बाकीचे समस्याकडे कुणीच लक्ष देत नाही या सर्व राजकीय पक्षांना जाब विचारण्या साठी तरुणांनानी पुढे यावे महादेव जानकर साहेब आणी राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सदैव आपल्या बरोबर असेल असे सांगितले जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हापरिषद नगरपालिका या सर्व निवडणुकातून निवडून गेलेले भ्रष्टाचार करणारे, ओबीसीवर अन्याय करणारे पक्ष ओळखा कुणाच्या भुलथापा बळी पडू नका परिवर्तन करा असे आव्हान केले याप्रसंगी केले दक्षिण जिल्हाध्यक्ष शाहजी कोरडकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी आपल्याला दिलेल्या पदाने तळागाळातील माणसापर्यंत पक्ष वाढीचे काम करावे असे सांगितले पूर्ण जिल्हा दौरा पश्चिम महाराष्ट्र युवाध्यक्ष अजित पाटील यांच्या नेतृत्वात पार पडला या दौरात जिल्हातील महाराष्ट्रचे सर्व नेते सामील झाले होते यामध्ये प्रदेशसरचिटणीस डॉ.शिवाजी शेंडगे, प्रदेश सचिव रविंद्र कोठारी,राज्य कार्यकारीणी सदस्य सय्यदबाबा शेख,राज्य सदस्य डॉ प्रल्हाद पाटील,उत्तर महाराष्ट्र प्रभारी शरदराव बाचकर,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस महेंद्र शिंदे, उत्तर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे दक्षिण जिल्हाध्यक्ष शाहजी कोरडकर, रभाजी खेमनर,माऊली जायभाये,आत्माराम कुंडकर,रमेश व्हरकटे,सीताराम वनवे,सुवर्णाताई जऱ्हाड, मंदाकिनी बढेकर,रेखा नरवडे, विलास सैंदोरे,डॉ सुनील चिंधे, दत्तात्रय कचरे,नंदकुमार खेमनर,विकास मासाळ, अंकुश बोके,भगवान करवर,डॉ कारंडे,अशोक मंचरे, संजय वाघमोडे, चिमाजी खामकर, लक्ष्मण कोकरे,नंदकुमार खरात,नामदेव काशीद,सोपान तांबडे,राजेंद्र लावरे,नानासाहेब जगताप,नानासाहेब काटकर रमेश बनकर, संदीप कांदळकर, अरुण शरमाळे,सचिन लाटे, बाजीराव लेंडाळ, गोरख होडगर, संतोष काळे सर,मालोजी तिखोले, कपिल लाटे तसेच आटपाडी, सांगली रासप नेते सत्यजित गलांडे, विशाल सरगर, समाधान गुटुकडे आदी या अभियानमध्ये सामील होते