1 जानेवारी 2023 च्या भीमा-कोरेगाव विजय स्तंभ येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण अधिक सूचना जारी*

*आळंदी पोलीस स्टेशन कडून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया च्या 1 जानेवारी 2023 च्या भीमा-कोरेगाव विजय स्तंभ येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण अधिक सूचना जारी*
प्रतिनिधी आरिफ भाई शेख
दि 1/1/ 2023 रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मोठ्या प्रमाणात भीमसैनिक अभिवादनासाठी येत असतात, वरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पडावी याकरिता आळंदी पोलीस स्टेशन सज्ज झाले आहे, विशेषता आळंदीतून मोठ्या प्रमाणात भीमसैनिक अभिवादनासाठी वाहने घेऊन जात असतात,या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते,त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून नुकतीच वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे, यामध्ये विशेष सूचना देण्यात आले असून वाहतुकीच्या मार्गाबाबत कळवण्यात आलेले आहे, चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशा दोन्ही बाजूंकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे, तसेच सोलापूर रोड वरून आळंदी चाकण या भागात येणारी जड वाहने, मालवाहतूक, टेम्पो,ट्रक ही सर्व वाहने, हडपसर मगरपट्टा खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदीकडे तसेच देहु फाटा चौकातून नाशिक रोड वरून चाकण येथे जातील, मुंबई येथून अहमदनगर कडे जाणारी जड वाहने मालवाहतूक टेम्पो ट्रक हि वाहने वडगाव मावळ, एचपी चौक, महाळुंगे वासुली फाटा, बिरदवडी गाव, रोहकल फाटा, पुणे नाशिक रोड, खेड,मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगर येथे जातील, तसेच आळंदी मरकळ लोणीकंद कडे जाणारी व येणारी सार्वजनिक खाजगी,प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंदी करण्यात येत आहे, मुंबईकडून देहूरोड येथे जुने पुणे मुंबई हायवेने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी चिंचवड कडे न जाता सदरची वाहतुकी सेंटर चौकातून मुंबई बेंगलोर हायवे ने वाकड नाका चांदणी चौकातून इच्छित स्थळी जाऊ शकतील,आळंदी, शेल पिंपळगाव, बहुळ, साबळेवाडी, दोन्ही बाजूकडील जाणारी व येणारी सार्वजनिक खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे,
मुंबई कडून एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे जाणारी वाहने उरसे टोलनाका येथून मुंबई बेंगलोर हायवेने मोकळी चौकाकडे न जाता सरळ वाकड नाकावर राधा चौक येथून पुण्याकडे वाहनांना प्रवेश दिला जाईल सर्व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अत्यावश्यक सेवेतील वाहने, उदाहरणार्थ फायर ब्रिगेड पोलीस वाहने रुग्णवाहिका इत्यादी अनुयायी यांची वाणी यांच्या खेरीत तात्पुरता स्वरूपाचा आदेश काढण्यात येत आहे वरील प्रमाणे चाकण माळुंगे दिल्ली पोलीस स्टेशन देहूरोड तळेगाव भोसरी वाहतूक विभाग अंतर्गत येणारे सर्व जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेस जड हलकी वाहने मालवाहतूक टेम्पो ट्रक वाहनांकरिता वरील मार्गावर दिनांक 31 12 2012 रोजी पासून ते दिनांक एक एक 2023 रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक वळवणे बाबत अधिक सूचना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेली आहे त्याची अंमलबजावणी आळंदी पोलीस स्टेशन मार्फत इतर पोलीस स्टेशन करणार आहेत याचे सर्वांनी माहितीसाठी सदर पत्रक आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी प् प्रसिद्धीस दिले आहे, दिनांक एक जानेवारी रोजीच्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे अभिवादनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांनी याची नोंद घ्यावी यासाठी आळंदी पोलीस स्टेशनकडून सूचना जारी करण्यात आली,