टाकळीभान परिसरात बेकायदा दारू व जुगार अड्ड्यावर छापा. या व्यक्तींची नावे आली समोर.

टाकळीभान परिसरात बेकायदा दारू व जुगार अड्ड्यावर छापा. या व्यक्तींची नावे आली समोर.
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळीभान परिसरात बेकायदा दारू विक्री व जुगार अड्ड्यावर श्रीरामपूर तालुका पोलीसांनी छापे टाकून कारवाई केली.
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांना मिळालेल्या माहितीवरून टाकळीभान परिसरात पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो ना. अनिल शेंगाळे, पो ना, प्रशांत रणनवरे व पो कों, संतोष कराळे यांना कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. त्यानुसार टाकळीभान ता श्रीरामपुर येथे पोलीसांनी छापा टाकून गावठी हातभट्टीवर कारवाई करुन सदर गुन्हयात एकुण २१५ लिटर तयार गावठी हातभट्टीची दारु व २७५० लिटर गावटी हातभट्टी तयार करण्याचे रसायन असा एकुण १२६५००/- रू किंमतीचा मुद्देमाल जागीच नाश करून गावटी हातभट्टीचे साधने व भट्टी उधवस्त करण्यात आली असून आरोपी संतोष आंद्रेस रणनवरे रा. टाकळीभान ता श्रीरामपुर 2) सोमनाथ ज्ञानेदव डुकरे 3) अमोल बाळु गायकवाड रा. वडारवाडा टाकळीभान ता श्रीरामपुर यांचेवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमा प्रमाणे, १) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४९३/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे २) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४९४/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (फ) (क) (ड)(ई) प्रमाणे ३) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४९५/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच कल्याण मटका व सोरट पान व इतर जुगार खेळण्याचे साहित्य असे एकुण ४२८०/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे १) संभाजी पिराजी धोत्रे २) लक्ष्मण माधव गोल्हार ३) पाराजी भिकाजी पुंड सर्व रा. टाकळीभान ता श्रीरमापुर यांचेवर महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे (१) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४८९/२०२२ महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम १२ (अ) प्रमाणे २) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४९०/२०२२ महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम १२(अ) प्रमाणे 3) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४९१/२०२२ महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम १२ (अ) प्रमाणे ४) श्रीरामपुर तालुका पो स्टे गुन्हा रजि नंबर ४९२/२०२२ महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम १२ (अ) प्रमाणे प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पो.ना. अनिल शेंगाळे, पो.ना. प्रशांत रणनवरे, पो.काॅ. संतोष कराळे यांनी केली आहे.