हरेगाव येथे ३०डिसेंबर रोजी विभागीय सीने गीत गायन स्पर्धा

हरेगाव येथे ३०डिसेंबर रोजी विभागीय सीने गीत गायन स्पर्धा
येथिल पार्थ फाईडर्स ग्रुपच्या वतीने शुक्रवार ३० डिसेंबर रोजी विभागीय स्तरीय सीनेगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सदर स्पर्धा या ट्रँकवर घेण्यात येणार असल्याची माहीती संयोजका कडून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.
विजेत्या स्पर्धकास प्रथम रू११०००, द्वितीय रू ७०००,तृतिय रू ५०००,चतुर्थ रू ३००० व उत्तेजनार्थ रू ३००० व चषक बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा या हरेगाव ग्रामपंचायत मागील मैदानावर सांय. ६ वा. होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिट वेळ गीत सादर करण्यासाठी देण्यात येणार असून २९ डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.स्पर्धकांनी आपले नाव संदिप धनेधर मो. नं. ९८६०५१९५५४,राहूल पंडित ७४९८८२९९८० , उमेश गायकवाड ९६६५९२४४२८ , प्रशांत वाघमारे ९७६५५००२५०, सद्दाम शहा ८८८८०२३३६४, अतुल भालेराव ८४२१७६१११० यांचे कडे नोंदवावी. असे आवाहन पार्थ फाईडर्स ग्रुप च्या सर्व सदस्यांना केले आहे.