बापूसाहेब तांबेंचे नेतृत्व राज्याला दिशादर्शक- राज्याध्यक्ष केशवराव जाधव*

*बापूसाहेब तांबेंचे नेतृत्व राज्याला दिशादर्शक- राज्याध्यक्ष केशवराव जाधव*
*प्राथमिक शिक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत राहुरी तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचा त्रैवार्षिक अधिवेशन मेळावा संपन्न…*
राहुरी- राहुरी तालुका शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळ त्रैवार्षिक अधिवेशन मेळावा पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघांचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव हे होते. बापूसाहेब तांबे यांचे संघटनात्मक काम व बँकेतील कामकाज राज्याला दिशादर्शक असून सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे प्रतिपादन त्यांनी केले.अशैक्षणिक कामाचा ताण शिक्षकांवर होत असून तंत्रज्ञान आपल्याच मानगुटीवर बसले असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी एकजुटीने राहिल्यास कोणत्याही लढ्यास आपण तयार आहोत. अशैक्षणिक कामाची भीती न बाळगता ते झुगारून देण्याचं धाडस शिक्षकांनी ठेवावे व त्यास संघ भक्कमपणे पाठिंबा देईल असे नमूद केले. बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील संघाचे काम राज्याला दिशादर्शक असून असे नेतृत्व राज्याला आदर्श ठरत आहे. बँक प्रशासनाचेही उत्कृष्ट कामकाजाबद्दल त्यांनी कौतुक केले.
अध्यक्षीय सूचना राणीताई साळवे यांनी मांडली तर ज्ञानदेव गागरे यांनी अनुमोदन दिले. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सभेला सुरुवात झाली.
प्रास्तविकात मा.विश्वस्त विठ्ठलराव काकडे यांनी राहुरी ही क्रांतिकारी असून संत गाडगे महाराजांच्या पावनभूमीतून घेतलेले सर्व निर्णय योग्य झाल्याचे सांगितले. बापूसाहेबांच्या मागे ठाम उभे राहत या बालेकिल्ल्याने गत निवडणुकीत मताधिक्य दिल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांचे सन्मान करण्यात आले.
कोषाध्यक्ष रविकरण साळवे यांनी अशैक्षणिक कामाचा शिक्षकी जीवनावर होत असलेला परिणाम सद्यस्थितीत शिक्षक संघटनांचा व शासनाचा समन्वय यावर सर्वांचे लक्ष वेधले.
साहेबराव अनाप यांनी बँकेतील दिशादर्शक काम व संघटना बांधणीत बापूसाहेबांचं कुशल नेतृत्व यावर विचार मांडले राहुरीनेच याच ठिकाणाहून वेगवेगळे ऐतिहासिक निर्णय घेऊन यशस्वी केल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
बँकेचे चेअरमन डॉ संदीप मोटे यांनी बँकेतील दिशादर्शक काम राज्याला आदर्श असून सभासदहित डोळ्यासमोर ठेवून निर्णय होत असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय अध्यक्षा विद्युलता आढाव यांनी राज्य संघ व जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या यावर मत व्यक्त केले. संघ म्हणजेच एकजूट. शिक्षकी प्रश्नांसाठी एकी महत्त्वाची असून सर्वांनी संघाला बळ देण्याचे आवाहन केले.
यावेळी राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक लक्ष्मीकांत ईडलवार व नरेंद्र राठोड, जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री अनिल कोल्हापुरे व श्री एकनाथ चव्हाण, गुणवंत शिक्षक पाल्य यांना सन्मानित करण्यात आले.
मा. व्हा. चेअरमन श्री अर्जुन शिरसाठ यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनेची असलेली गरज आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी शिक्षक नेते श्री राजेंद्र मरभळ व सोन्याबापू आंबेकर यांनी त्यांच्या समर्थकांसह गुरुकुल मंडळाला रामराम ठोकत गुरुमाऊली मंडळाच्या सभासदहिताच्या कारभारासोबत येण्याचे ठरवत गुरुमाऊली मंडळात जाहीर प्रवेश केला.
जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी आपल्या खुमासशैलीत ऐतिहासिक दाखले देत संघटनेच्या कामकाजाची मांडणी केली.
जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी शिक्षकांसाठी अविरत काम करत असल्याचे सांगितले. सर्वजण संघटनेत सारखे असून नव्याने प्रवेशित झालेल्यांनीही संघ विचारधारेशी समरस व्हावे असे आवाहन केले. बँकेतील निर्णय सर्वांनुमते घेत असल्याचे सांगत राज्याला दिशादर्शक होईल असे कामकाज बँकेत चालू असल्याचे सांगितले. अशैक्षणिक कामाबद्दल भविष्यात मोठा लढा उभारू असे सांगत राज्यातील आंदोलन अथवा इतर संघटनात्मक कार्यात नगर जिल्हा सक्षमपणे उभा राहील असे आश्वासित केले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष श्री दत्ता पाटील कुलट यांनी कार्यकारणी जाहीर केली. राहुरी तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी श्री निवृत्ती धुमाळ, गुरुमाऊली मंडळाच्या अध्यक्षपदी श्री राहुल खराडे, तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीम. राणीताई साळवे, तंत्रस्नेही संघाच्या अध्यक्षपदी श्री बाबाजी मुंढे, तालुका पदवीधर शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी श्री दिलीप वर्पे, तालुका उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी श्री ज्ञानदेव गागरे यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारणीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी मा. चेअरमन संतोष दुसुंगे,राजू रहाणे, सलीम खान पठाण, जिल्हासंघांचे सरचिटणीस मनोजकुमार सोनवणे तसेच राजेंद्र शिंदे,माधवराव हासे, विठ्ठल फुंदे,बाबा खरात, गोकुळ कळमकर, मुकेश गडदे, राजेंद्र सदगीर,नवनाथ तोडमल,रविंद्र पिंपळे,बाबा आव्हाड, भास्कर कराळे,विजय नरवडे, विजय ठाणगे, बाळासाहेब कापसे,नारायण पिसे, बाबाजी डुकरे, पांडुरंग काळे,रामचंद्र गजभार,राम वाकचौरे, बाळासाहेब आरोटे, अंजली मुळे, जयेश गायकवाड, राजेंद्र कुदनर,बबन गाडेकर, संतोष टकले, शरद वांढेकर,जनार्दन काळे, व्हा चेअरमन कैलास सारोक्ते, संचालक गोरक्षनाथ विटनोर,अण्णासाहेब आभाळे, भाऊराव राहींज,सरस्वती घुले, निर्गुणा बांगर, मिनाज शेख, योगेश वाघमारे, शशिकांत जेजुरकर, माणिक कदम, बाळासाहेब सरोदे, रामेश्वर चोपडे रमेश गोरे, ज्ञानेश्वर शिरसाठ, संतोषकुमार राऊत,बाळासाहेब तापकीर,महेश भणभणे, सूर्यकांत काळे, कारभारी बाबर, विकास मंडळाचे अध्यक्ष विलास गवळी, उपाध्यक्ष संजय शेंडगे, सचिव संतोष मगर,विश्वस्त चांगदेव काकडे, उर्मिला राऊत, प्रल्हाद भालेकर,नवनाथ दिवटे, गणेश गायकवाड,पंडित हजारे विठ्ठल काळे, संतोष वाघमोडे,भाऊसाहेब दातीर यांच्यासह सर्व तालुक्यांचे शिक्षक संघ व मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी मान्यवर तसेच राहुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक प्रचंड संख्येने उपस्थित होते.