सावता परिषदेच्या अधिवेशनास माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – मनिषा सोनमाळी

सावता परिषदेच्या अधिवेशनास माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – मनिषा सोनमाळी
कर्जत प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रातील माळी समाजाच्या विविध प्रश्नावर विचार मंथन करण्यासाठी सावता परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. ४ मार्च रोजी अहमदनगर येथील टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनिषा सचिन सोनमाळी यांनी दिली. सोनमाळी यांनी सांगितले की या माळी समाजाच्या अधिवेशनास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार असून सावता परिषदेचे सस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन व माळी समाज बांधवांचा मेळावा संपन्न होणार असून या मेळाव्यास कर्जत तालुक्यातील सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्षा मनिषा सोनमाळी यांनी केले आहे. तसेच सोनमाळी म्हणाल्या की राज्यातील सर्व माळी समाज संघटित करण्याचे काम या सावता परिषदेच्या माध्यमातून होत आहे. संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब आणि दिन दुबळ्या सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. तरी या कार्यक्रमास सावता परिषदेच्या पदाधिकारी, सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनमाळी यांनी केले आहे.