पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ;तात्काळ पंचनामे करा- खा.डॉ.प्रीतम मुंडे*

*पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ;तात्काळ पंचनामे करा- खा.डॉ.प्रीतम मुंडे*
मागील वीस दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीत सोयाबीन, उडीद, मूग, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान असून याची चौकशी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांना पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की,बीड जिल्ह्यामध्ये मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची चौकशी करून पंचनामे करणे अत्यंतआवश्यकआहे.मागील वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन फुलोरा असताना ही दाणे भरण्याची प्रक्रिया थांबली आहे तसेच कापसामध्ये पण पातेगळ (पाने गळणे) होत आहे. त्याच बरोबर मुग, उडीद इत्यादी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.अशा संकटसमयी याबाबत चौकशी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी केली आहे.