कर्जत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याणे ताबडतोब घेऊन जावा अन्यथा तीव्र आंदोलन करु – माजी मंत्री राम शिंदे

कर्जत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याणे ताबडतोब घेऊन जावा अन्यथा तीव्र आंदोलन करु – माजी मंत्री राम शिंदे
– कर्जत तालुक्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देऊन प्रशासनाने एकरी एक लाख रुपये मदत करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज कर्जत येथे भाजपा च्या वतीने मा. तहसीलदार यांना माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील शेतकरी हा येथील समंधीत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळोवेळी अडचणीत येत आहे. कुकडीचे सुटलेले आवर्तन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरले आहे व बहुतांश क्षेत्र हे पाण्यावाचून वंचित राहिले आहे. तर तालुक्यातील कारखान्याने कार्य क्षेत्राबाहेरील ऊस अगोदर गाळप केल्याने उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे.ऐवढेच नाही तर अंबालिका कारखाना परिसरातील उसाची तोड होत नसल्याने अनेकांनी ऊस जाळल्याचे ही समोर येत आहे. व भविष्यात देखील असे प्रकार घडण्याची शक्यता आहे त्याच बरोबर ऊसतोड मजूर ते चीट बॉय व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची आर्थिक दृष्ट्या लूट केली जात आहे व ठराविक व काही स्थानिक नेत्यांच्याच समर्थक शेतकऱ्याचाच ऊस तोडून नेहला जात आहे या सर्व गोष्टी शेतकरी निमूटपणे सहन करतच आहे मात्र तरी देखील शिल्लक उसाचा प्रश्न प्रशासन सोडवु शकत नाही अशी एकूण परिस्थिती पाहता लक्षात येत आहे ऊसाचे पीक घेणारे शेतकरी आळशी असतात असे म्हणणाऱ्या परंतु त्यावरच आपलं राजकारण जिवंत ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्यांच्याच घरातील साखर कारखाने हे तालुक्यात आहेत तरी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना एव्हढी सापत्नीक वागणूक का मिळते ते समजत नाही असा सवाल माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केला.
तरी या अतिरिक्त ऊस प्रश्नात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून तालुक्यातील उसाचे टिपरू देखील शिल्लक राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी कुकडीच्या आवर्तनाच्या भोंगळ नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे व शेतातील ऊस पाण्याअभावी डोळ्यादेखत जळताना दिसत आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता तालुक्यातील शेतकऱ्यांना संबंधित प्रशासनाने एकरी एक लाख रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई म्हणून मदत करावी.
ऊसा च्या या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची दखल घ्यावी असा इशाराही यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिला
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ सुनिल गावडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, ज्ञानदेव लष्कर, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, बापुसाहेब शेळके, प्रकाश शिंदे, सुदर्शन कोपनर, राहुल निंबोरे, कीसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव, अनिल गदादे, विनोद दळवी, हनु गावडे, तात्यासाहेब माने, आदींसह कर्जत तालुका भाजपा चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते.