हक्काच्या जमिनी मिळवाण्यासाठी न्यायालयीन लढा बरोबरच रस्त्यावरील लढ्याला सज्ज व्हा -अॅड. अजित काळेचे आव्हाहन.

हक्काच्या जमिनी मिळवाण्यासाठी न्यायालयीन लढा बरोबरच रस्त्यावरील लढ्याला सज्ज व्हा -अॅड. अजित काळेचे आव्हाहन.
माळवाडगाव :-शनिवार दि.२५ /३/२०२३ रोजी माळवाडगाव येथे आकारी पडीत शेतकरी मेळावा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संभाजीनगर खंडपिठाचे विधितज्ञ् अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. राज्यात खंडकरांच्या वारसांना जमिनीची वाटप झाले परंतु आकारी पडीत शेतकऱ्यांना जमीन वाटण्याचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.यासाठी मागील २० वर्षापासून माळवाडगाव सह परिसरातील आकारी पडित शेतकरी लढा देत आहे, त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे जेष्ठविधीज्ञ ॲड अजित काळे यांची आग्रही भूमिका आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माळवाडगाव येथे आकारी पडित शेतकऱ्यांची परिषद संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.मा न्यायालयात शासन खोटे शपथपत्र सादर करते याबाबतही आपण न्यायालयाची दिशाभूल केले प्रकरणी अवमान याचिका दाखल करणार असलेचे अॅड काळे म्हणाले
आकारी पडीत शेतकऱ्यांचा लढा हा अतिशय महत्त्वाचा असून ब्रिटिश शासनाने १९१८ साली ३० वर्षाच्या कराराने शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करून परत देण्याच्या बोलीवर घेतल्या होत्या. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि सदर जमिनी या राज्यकर्त्यांनी महामंडळाच्या नावे केल्या .या शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच या ठिकाणी आकारी पडीत शेतकरी मेळावेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी आता आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या हक्काच्या जमिनी मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे. मी देखील या लढ्यामध्ये सर्वात पुढे राहील. आकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी माझ्यावर केसेस झाल्या तरी चालतील परंतु या ९ गावच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत राहील असे प्रतिपादन यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड अजित काळे यांनी माळवाडगाव येथे उपस्थित शेतकऱ्यांसमोर केले आहे.
शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी मिळविण्यासाठी येत्या शनिवारी श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी ॲड अजित काळे यांनी केले. जोपर्यंत आकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही .शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा सुरूच राहील असेही यावेळी ॲड अजित काळे म्हणाले.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्तर वर्षाचा मोठा कालावधी लोटाला.इंग्रज राजवातीत घेतलेल्या हक्काच्या जमिनीसाठी स्वातंत्र्यातही सात दशकापर्यंत न्यायालयीन व रस्त्यावरचा लढा द्यावा लागतो, त्याचबरोबर सुदैवाने जिल्ह्याला गेली विस वर्षापासून महसूलमंत्री पदे मिळाले परंतु अकारी पडीक शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही हे दुर्दैव आहे. शनिवारी मोठया संख्येने आत्मकलेश औंदोलनाला गांधींपुतळा मेन रोड येथे उपस्थित रहा अ. नगर शेतकरी संघटना आपल्या पुढे राहील. राज्य सरकारने २००५ ला पेशंन बंद कायदा करूनही कर्मचाऱ्यांच्या औंदोलनानंतर सरकार कायदा बदलते तर हक्काच्या जमिनीसाठी शासन निर्णय का घेत नाही असा सवालही केला. यावेळी मोठा संख्येने आकारी पडीक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कॉ. आण्णापाटील थोरात, अंबादास आदिक, वसंतराव मुठे,ॲड प्रसन्न बिंगीसुरेश ताके,ॲड सर्जेराव घोडे,युवराज जगताप,सुदामराव औताडे,दिलीप गलांडे,साहेबाराव चोरमळ,विजयराव शेळके,दगडू आसने,रमेश आढाव चंद्रभान चोरमळ,डॉ. दादासाहेब आदिक,बाळासाहेब बकाल,सुरेश डाके, लक्ष्मण चिडे,बाळासाहेब आसने, बाळासाहेब हूरुळे, भारत शिंदे,गणपतराव आसने, शिवाजीराव रुपटक्के,भारत शिंदे, जयदीप आसने,प्रमोद आसने, विठ्ठल आसने, सुनील आसने भरत आसने,अनिल आसने, अरुण आसने,भाऊसाहेब आसने, गोकुळ त्रिभुवन,दिगंबर आढाव, सुभाष आसने,पांडुरंग पवार, सुभाष मुठे, मच्छिंद्र हूरुळे, डॉ. इलियास पठाण, विठ्ठलराव आसने , संदीप आसने सह आदी शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विठ्ठलराव आसने यांनी सूत्रसंचालन केले तर शरद आसने यांनी आभार मानले.