संजय उंबरगीकर यांना सोनईरत्न पुरस्कार प्रदान.. आ शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत सोनई नवरात्र मोहत्सवाची सांगता.

संजय उंबरगीकर यांना सोनईरत्न पुरस्कार प्रदान..
आ शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत सोनई नवरात्र मोहत्सवाची सांगता.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई व जगदंबा देवी ट्रस्ट सोनई यांच्या संयुक्त विद्यमाने सोनई ता नेवासा येथे 9 दिवस धार्मिक सप्ताह,विविध संस्कृतीक उपक्रम,विविध स्पर्धासह नवरात्र मोहत्सव साजरा करण्यात आला.
मंगळ दि 24 ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमिनिमित्त आ शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते व विश्वासराव गडाख,युवा नेते उदयन गडाख यांच्या उपस्थितीत संजय मोहनीराज उंबरगीकर(मामा) यांना सोनई रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते उदयन गडाख यांनी केले याप्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणाले की सोनई व परिसरातील सर्व नागरिक व ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात सोनई महोत्सव साजरा केला पुढील वर्षीही आपण सर्वांना सोबत घेऊन व्यापक स्वरूपात साजरा करू असे म्हणाले.शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या गणेश
उंबरगीकर यांना पुरस्कार देतांना मनाला विशेष आनंद होत आहे असे उदयन गडाख म्हणाले.
सोनईरत्न पुरस्कार देऊन विशेष सन्मान केला व आपल्या माणसांनी केलेला सन्मान विशेष आनंद देऊन गेला व यातून मोठे बळ व ऊर्जा मिळाली असे संजय मोहिनीराज उंबरगीकर म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना शंकरराव गडाख म्हणाले की सोनईकर यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व जगदंबा देवी ट्रस्ट यांच्या वतीने अतिशय सुरेख असा सोनई मोहत्सव साजरा करतात ही बाब अभिमानास्पद आहे.
सोनई परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असणाऱ्या व वयाच्या 15 व्या वर्षी कायमस्वरुपी अपंगत्व येऊनही शैक्षणिक अखंड काम करणाऱ्या व अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या संजय मोहिनीराज उंबरगीकर यांना दिला ही बाब कौतुकास्पद अशीच आहे व उपस्थित सर्वांना आ गडाख यांनी विजयादशमिनिमित्त शुभेच्छा दिल्या.
आ शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बैलपोळा आकर्षक सजावट स्पर्धा,क्रीडा स्पर्धा,पाककला स्पर्धा,संस्कृतीक स्पर्धा आदींच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,सभापती सुनीलराव गडाख,उदयन गडाख,मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर,उदय पालवे,राजेंद्र गुगळे,धनंजय वाघ, रणजित जाधव,सीताराम झीने,भागवत बानकर,जालिंदर येळवंडे, राजेंद्र बोरुडे,हरिभाऊ दरंदले,प्रदीप घावटे,मिलिंद बोंगाणे,संजय उंबरगिकर यांचे कुटुंबिय आदींसह सोनई परिसरातील ग्रामस्थ यशवंत प्रतिष्ठान सदस्य व जगदंबा देवी ट्रस्ट सदस्य आदी उपस्थित होते.स्वागत प्राचार्य डॉ
गोरक्षनाथ कल्हापुरे
यांनी सूत्रसंचालन माजी प्राचार्य बाबासाहेब मुसमाडे यांनी केले.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर रावण दहन करण्यात आले.
सोनई परिसरात शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या संजय मोहिनीराज उंबरगीकर यांना 2023 चा सोनईरत्न पुरस्कार प्रदान करून शैक्षणिक क्षेत्रात सेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विशेष सन्मान करण्यात आला.
15 व्या वर्षी कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या संजय मोहिनीराज उंबरगीकर (मामा)
यांच्या सन्मानाने दिव्यांग बांधवानी समाधान व्यक्त केले.