विविध उपक्रमांनी विजय जगताप यांचा वाढदिवस साजरा.

विविध उपक्रमांनी विजय जगताप यांचा वाढदिवस साजरा.
फुले शाहू आंबेडकर चळवळीतील व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जुने कार्यकर्ते विजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत फ्लेक्स बोर्ड लावण्यापेक्षा समाजातील जे मुले शाळेत हुशार असणाऱ्या मुलांना वह्या पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही अशा दलित वस्तीमधील शाळेतील मुलांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्स लावून होणारा खर्च टाळून हुशार विद्यार्थ्यांना व या पुस्तकाच्या वाटप केल्याने मनाला समाधान लागते असेही दलित चळवळीत कार्यकर्त्यांनी सांगितले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे घडले याबद्दल माहिती दिली फुले शाहू आंबेडकर याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना जगताप म्हणाले की आपल्या समाजातील हुशार विद्यार्थ्यांना वस्तू भेट देऊन त्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आयामागील उद्देश अशा पद्धतीने समाजातील व्यक्तीने समाजामधील युवकांसमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे यासाठी समाजातील युवकांनी समाजासमोर आदर्श निर्माण करण्याची गरज आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार विजय खंडागळे, मोहन शेगर, अशोक भुसारी व दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोनई चे माझे सरपंच दादासाहेब वैरागर, सचिन पवार, दिलीप काका शिंदे, सागर वैरागर, अवी वैरागर , गणेश काकडे, आकाश काकडे, लखन वैरागड, प्रकाश काकडे, गणेश वैरागर, सोना काकडे, आदित्य साळवे, केतन जगताप, किरण गायकवाड, विशाल जगताप, अनिकेत गायकवाड, अभि भालेराव, अक्षय पंडित आदी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते