अपघात
टाकळीभान येथील युवक व्यापाऱ्याचा गुजरात मध्ये अपघातात मृत्यू,

टाकळीभान येथील युवक व्यापाऱ्याचा गुजरात मध्ये अपघातात मृत्यू,
टाकळीभान -प्रतिनिधी- टाकळीभान येथील प्रसिद्ध व्यापारी गोविंद लुंड ,यांचे चिरंजीव संजय गोविंद लुंड,(वय38) यांचे नुकतेच सायला राजकोट येथे अपघाती निधन झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय लुंड हे हल्ली पिंपरी चिंचवड येथे कपड्यांचा व्यवसाय करत होते,
संजय आपल्या परिवारासह नागेश्वरी ज्योतिर्लिंग दर्शन करून, परत येत असताना गुजरात येथील सायला राजकोट येथे, त्यांच्या गाडीचा भीषण अपघात होऊन, या अपघातात गाडी चालक व संजय लुंड हे दोघेजण अपघातात जागीच ठार झाले, तर संजय लुंड यांची पत्नी, एक मुलगी व मुलगा हे अपघातात जखमी होऊन त्यांच्यावर राजकोट येथील दवाखान्यात उपचार चालू आहेत. संजयच्या निधनाने टाकळीभान गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,