महाराष्ट्र

आळंदीत “माझी माती, माझा देश”अभियान*

*आळंदीत “माझी माती, माझा देश”अभियान*

 

आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभर राबविले जात असलेल्या “माझी माती,माझा देश” अभियानात सहभागी होवून आळंदी नगरपरिषदेने अनेक उपक्रम राबविले असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

*पंचप्रण शपथ*

आळंदी नगरपरिषद मार्फत ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विविध शाळा, कॉलेज येथे कार्यक्रम घेवून ६००० जणांना पंचप्रण शपथ दिली गेली.

*अमृत रोपवाटिका*

आळंदी नगरपरिषदेने “माझी माती माझा देश” या अभियाना अंतर्गत दिनांक ९ ऑगस्ट क्रांती दिनी इंद्रायणी सेवा फाऊंडेशन व MIT कॉलेज यांच्या सहकार्याने १२० NSS विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ७५ देशी वृक्षांच्या “अमृत रोपवाटिके” ची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

*सैनिकांचा सन्मान*

दिनांक १४ ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथे सध्या मध्यप्रदेश येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सुदाम अशोक मुंडे(नाईक)व कार्तिक पितळे(सुभेदार) यांचा नगरपरिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला.यावेळी त्यांच्या हस्ते शिलाफलकाचेअनावरण व झेंडा वंदन करण्यात आले.

    हे अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी शिवशरण,शीतल जाधव,किरण आराडे यांनी नियोजपूर्वक सर्व उपक्रम राबविले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे