संपादकीय
वांगी बुद्रुक मध्ये दोन दिवस वीरभद्र (बिरोबा महाराज) यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात होणार साजरा

वांगी बुद्रुक मध्ये दोन दिवस वीरभद्र (बिरोबा महाराज) यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात होणार साजरा
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक वांगी खुर्द व पंचक्रोशी चे आराध्य दैवत म्हणून जागृत देवस्थान बिरोबा महाराज यात्रा उत्सव दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो दरवर्षी यात्रेच्या अगोदर गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते परंतु या वर्षी कोरोना परिस्थिती लक्षात घेता होणारा सप्ताह कमिटीने नियोजन करून पुढे ढकलण्यात आलेला आहे परंतु दरवर्षी प्रमाणे यात्रा भरणार असून भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे वांगी(भगत-दत्तू कोपनर, बाळासाहेब कदम ,सागर माने) ग्रामस्थांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.