झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव..आळंदीत दिवाळीनिमित्त तोबा गर्दी बाजारपेठा गजबजल्या*

*झेंडूच्या फुलांनी खाल्ला भाव..आळंदीत दिवाळीनिमित्त तोबा गर्दी बाजारपेठा गजबजल्या*
आळंदी/दिवाळीनिमित्त आळंदीतील सर्व बाजारपेठ गजबजलेल्या दिसून आल्या. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली घरात त्यांच्या दुतर्फा मोठ्या स्वरूपामध्ये दुकानांच्या रांगा होत्या दिवाळी हा सण आनंदाचा असा सर्वात मोठा सण मानला जातो. तसेच दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना आणि लक्ष्मी लाडूला महत्त्वाचा स्थान असते लक्ष्मीपूजन च्या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच घरातील विविध भागांमध्ये दिव्यांची रोषणाई केली जाते आणि झेंडूंच्या फुलांची आराखळी केली जाते यावेळी आळंदी मध्ये ज्याप्रमाणे झेंडूंच्या फुलांना दिवाळीत महत्त्व आहे तसेच महत्त्व दसऱ्याच्या सणालाही असते काही दिवसापूर्वी आलेल्या दसऱ्याच्या स्थानामध्ये झेंडूंच्या फुलांकडे ग्राहकाने पाठ फिरवली आळंदीत मोठ्या प्रमाणात झेंडू आला मात्र भावना मिळाल्यामुळे खप न झाल्यामुळे झेंडू अक्षरशा रस्त्यावर फेकून देऊन व्यापारी निघून गेले काही लोकांनी तर झेंडूंची लावलेली दुकान तशीच सोडून भावना मिळाल्यामुळे निघून गेले होते. मात्र दिवाळीमध्ये या झेंडू ने चांगलाच भाव खाल्ला. दसऱ्याच्या दिवशी वीस रुपये किलो ओरडून सुद्धा ग्राहक झेंडूच्या फुलांना हात न लावता जात होते प्लास्टिकच्या झेंडूंच्या आहारामुळे दसऱ्याच्या दिवशी झेंडूवर खरेदी विक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेचे दिसून आले होते. दिवाळीमध्ये या झेंडू ने आळंदीत सुरुवातीच्या वेळी पन्नास नंतर शंभर नंतर शेवटच्या काही क्षणात दीडशे ते दोनशे रुपये किलो विक्री असा भाव खाल्ला चांगल्या प्रतीचा भाव मिळाल्यामुळे आणि अचानक वाढलेल्या झेंडूच्या भावामुळे दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीमध्ये झेंडू ने चांगलाच भाव खाल्ला आळंदीत रस्त्यावर वास्तव्यस्त पडलेल्या झेंडू दसऱ्याच्या दिवशी दिसून येत होता मात्र तोच झेंडू दिवाळीच्या वेळी मात्र दीडशे ते दोनशे रुपये किलोने नागरिक घेण्यास मजबूर झाल्याचे दिसून आले.