राजकिय
केंद्रीय राज्यमंत्री ना.पटेल यांची टाकळीभान येथे धावती भेट.

केंद्रीय राज्यमंत्री ना.पटेल यांची टाकळीभान येथे धावती भेट.
केंद्रीय राज्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग व जलशक्ती मंत्रालय ना.प्रल्हादसिंह पटेल यांनी नूकतीच टाकळीभान येथे धावती भेट दिली.
श्रीरामपूर येथे आयोजीत लाभार्थी संवाद मेळाव्यासाठी जात असताने टाकळीभान येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ना.पटेल हे काही वेळ थांबले. या धावत्या भेटी प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा छोटेखाणी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे नारायण काळे, मुकूंद हापसे, भारत गुंजाळ, श्रीकृष्ण वेताळ, भाऊ सुडके,संजय पवार, प्रताप लोखंडे, नंदू काळे, सतीश शेळके ,बापूसाहेब साळवे, शंकर लाड, अरूण वाकडे, सुधिर पटारे, विकास मगर आदी उपस्थित होते.