कोरोनामुळे निराधार झालेल्या 125 महिलांना शिलई मशीनचे वाटप.

कोरोनामुळे निराधार झालेल्या 125 महिलांना शिलई मशीनचे वाटप.
स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशनच्या पुढाकाराने ना शंकरराव गडाख व सौ दुर्गाताई तांबे उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
कोरोनामुळे निराधार झालेल्या नेवासा तालुक्यातील विविध गावांमधील 125 महिलांना स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशनच्या वतीने मा सभापती सौ सुनीताताई गडाख यांच्या पुढाकाराने शिलई मशीन व साडी वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषांचे दुःखद निधन झाल्याने निराधार झालेल्या महिलांवर मोठे संकट कोसळले आहे त्यामुळे कुटुंबाची गुजराण कशी करायची हा प्रश्न या भगिनींपुढे निर्माण झाला होता म्हणून ही गैरसोय लक्षात घेऊन स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशनच्या वतीने मा खा यशवंतराव गडाख, ना शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी निराधार महिलांना शिलई मशीन वाटप करण्यात आले.स्व ताईसाहेब कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त सन 2010 पासून नेवासा तालुक्यातील निराधार महिलांना मदत वाटप केली जाते यावर्षीचे 12 वे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुनीताताई गडाख यांनी केले याप्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या की कोरोनामुळे ज्या भगिनींच्या पतींचे निधन झाले त्या महिलांना आधार मिळावा,दुःख हलके व्हावे कुटुंबाचा गाडा चालवताना आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी सामाजिक जाणिवेतून 125 महिला भगिनींना शिलई मशीनचे व साडीचे वाटप आज करण्यात आले आहे. महिला भगिनींनी दुःख बाजूला सारून पुढील जीवन जगावे.ना शंकरराव गडाख भाऊ म्हणून सदैव आपल्या बरोबर राहतील असा विश्वास दिला.याप्रसंगी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले.निराधार महिलांना आधार देणाऱ्या शिलई मशीनच्या भेटीने महिला भगिनींनी दुःख बाजूला सारत आनंदाने जीवन जगावे.जीवनात येणाऱ्या अडचणींना सर्मथपणे तोंड द्यावे.ना शंकरराव गडाख यांचे पाठबळ आपल्याबरोबर आहे.जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यावे व जीवन समाधानी आनंदी जगावे.आर्थिक दृष्टया सक्षम व्हावे मुलांना उच्च शिक्षित करून आपले स्वप्न पूर्ण करावे मुलांच्या प्रगतीतच आपले हित आहे.वैधव्य बाजूला सारत उत्साहाने सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावे व इतर भगिनींनाही धीर द्यावा. सौ सुनिताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशन तुमच्या बरोबर भक्कमपणे उभे आहे.फाउंडेशन राबवत असलेले उपक्रम इतरांना प्रेरणादायी असेच आहे असे सौ तांबे म्हणाल्या.याप्रसंगी ना शंकरराव गडाख यांनी उपस्थित भगिनींशी संवाद साधत धीर धरत मार्गक्रमण करा ,दुःख बाजूला सारून पुढे जा.आपण सकारत्मक राहिले तर जीवन जगणे सोपे जाते असा आशावाद उपस्थित महिला भगिनींना दिला.याप्रसंगी मुक्ताताई चिंधे यांनी फाऊंडेशनच्या वतीने आधार दिल्याबद्दल आभार मानले.
याप्रसंगी नानासाहेब तुवर,कडूबाळ कर्डीले,कारभारी जावळे आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार सौ निलांगीताई विजयराव गडाख यांनी मानले .याप्रसंगी युवा नेते उदयन गडाख,जीप सदस्या सुरेखाताई साळवे,सभापती रावसाहेब कांगुणे,तुकाराम शेंडे,सविताताई झगरे,मीनाक्षीताई एडके,वैशालीताई एडके,प्रा जयश्रीताई गडाख,सरोजताई गडाख,कैलास झगरे,बाळासाहेब सोनवणगबे,एकनाथ धानापुणे,राजू भालेराव,बाबा अनारसे,उदय पालवे,दादा वैरागर,एकनाथ गडाख आदींसह स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
घरातील कर्त्या पुरुषाचे दुःखद निधन झाल्यानंतर निर्माण झालेल्या मोठ्या पोकळीत ना शंकरराव गडाख व सौ सुनीताताई गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली स्व ताईसाहेब कदम फाऊंडेशनच्या वतीने शिलई मशीनची भेट देऊन निराधार महिलांना सन्मानाने उभे केले याबद्दल ताईसाहेब कदम फाउंडेशनचे नेवासा तालुका व परिसरात कौतुक होत आहे.
125 महिलांना साडी व शिलई मशीनची भेट देऊन त्या मशीन घरपोहोच करण्यात आल्या व अनोखी बांधिलकी जपण्यात आली.
सोनई ता नेवासा.निराधार महिलांना शिलई मशीनचे वाटप करतांना ना शंकरराव गडाख,नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे,मा सभापती सौ सुनीताताई गडाख व उपस्थित महिला