वांगी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक अखेर थंडावली.अशी झाले नवनियुक्त सरपंच व सदस्य.

वांगी खुर्द ग्रामपंचायत निवडणूक अखेर थंडावली.अशी झाले नवनियुक्त सरपंच व सदस्य.
श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला. दोन्ही गट आपापसात दंड थोपडून उभे ठाकले सर्वांनी आपापले फॉर्म भरले असताना .
आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी, सचिन दादा राऊत व माजी लोकनियुक्त सरपंच काकासाहेब साळे एकमेकांसमोर आले असताना राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी मनाचा मोठेपणा दाखवत माजी लोकनियुक्त सरपंच काकासाहेब साळे यांनी तरुण तडफदार नेतृत्व असलेले सचिन दादा राऊत यांच्या पार्टीच्या ताब्यात सर्वांनी एकत्र बसून काकासाहेब साळे यांच्या बाजूचे सर्व फॉर्म माघारी घेत.
सचिन दादा राऊत यांच्या पार्टीच्या ताब्यात एक हाती सत्ता देऊन गावचा विकास करावा अशा अपेक्षा ठेवत माजी लोकनियुक्त सरपंच काकासाहेब साळे यांनी माघार घेतल्याने वांगी खुर्द ग्रामपंचायत आज रोजी आपसात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
यामध्ये सरपंच पदाच्या उमेदवार सौ. संगीता राजेंद्र कांबळे उपसरपंच सचिन भगत राऊत सदस्य विमल गेनदास मोरे, अनिल मोहन कोपनर, मीनाक्षी विजय पडळकर, अनिता ज्ञानेश्वर गायकवाड, चारुशीला विष्णुदास जगताप, सुभाष खंडू मोरे हे सर्व बिनविरोध निवडून आल्याने ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांना शुभेच्छा दिल्या.