संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने ३ फेब्रुवारी पासुन भव्य सत्संग सोहळ्याची सुरुवात

गेवराईत संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने ३ फेब्रुवारी पासुन भव्य सत्संग सोहळ्याची सुरुवात
गेवराईकरांसाठी संगित महोत्सवाची खास मेजवानी तर दि.३ रोजी हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे सुश्राव्य किर्तन
गेवराई येथील संस्कृती प्रतिष्ठान च्या वतिने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि.३ फेब्रुवारी पासुन भव्य सत्संग किर्तन सोहळा महोत्सवास प्रारंभ होत असुन या सोहळ्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम नामवंत किर्तनकारांची किर्तन सेवेसाठी उपस्थिती लाभणार आहे. या किर्तन महोत्सवाचे हे १६ वे वर्ष आहे. सध्या या सत्संग किर्तन सोहळ्याची जोरदार तयारी चालु असुन प्रतिष्ठानच्या वतीने सर्व पदाधिकारी आपले मोलाचे योगदान देत आहेत. तरी गेवराईकरांनी या सत्संग किर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतिने करण्यात आले आहे.
गेवराई येथे संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने गेल्या १५ वर्षापासून भव्य दिव्य अश्या सत्संग किर्तन सोहळ्याचे दरवर्षी नियोजनबध्द अयोजन केले जात आहे. यामध्ये शहरातील तसेच तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. तर या वर्षीच्या सत्संग किर्तन सोहळ्यास दि.३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. प्रतिमापूजन ह.भ.प.रामेश्वर महाराज राऊत, मनोहरभाऊ पिसाळ, शिवनाथ मस्के यांच्या हस्ते व कलश पुजन प्रभाकर पराग, संजय भालशंकर, चंद्रकांत राऊत यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणुन शिवाजीराव ( दादा ) पंडित, आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार बदामराव पंडित, डॉ नारायणराव मुंडे अदिंच्या उपस्थिती मध्ये सत्संग किर्तन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. तर सत्संग किर्तन सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. शुक्रवार दि.३ रोजी सायं.६ वा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त संगीत गितांचा कार्यक्रम सायं ८ वा. हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे सुश्राव्य किर्तन, तर शनिवार दि. ४ रोजी सुप्रसिद्ध गायक आदिनाथ सटले व अदिती सटले यांचा अभंगवाणी कार्यक्रम, सायं ८ वा. ह.भ.प गणेश महाराज शास्त्री यांचे किर्तन होईल. तर रविवार दि. ५ सायं.६ वाजता संत भगवानबाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा माजी आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित व सुरेश नवले यांच्या शुभहस्ते व दिलीपराव गोरे, कल्याण आखाडे, विनायक ढाकणे, संतोष भंडारी, गणेश तोळणे, भागवत तावरे आदींच्या उपस्थितीत ह.भ.प प्रकाश महाजन बोधले ( अध्यक्ष अ.भा. या महामंडळ ), ह.भ.प माधव महाराज ढाकणे ( आळंदी ), रमेश महाजन वसेकर, पं.श्री कल्याणजी गायकवाड ( प्रसिद्ध गायक व संगीतकार ), पं.दासोपंत स्वामी ( प्रख्यात पखवाज वादक, आळंदी ) यांना वितरीत करण्यात येणार आहे. सायं.८ वा. हभप डॉ यशोधन किसन महाराज साखरे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. सोमवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता संगीत अलंकार सदानंद मगर व वैष्णवी मगर यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम संध्याकाळी ८ वाजता रामाचार्य ह.भ.प उध्दव महाराज चोले यांचे सुश्राव्य किर्तन होईल तर मंगळवार दि.७ रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय भारुडकार हमिद अमिन सय्यद यांच्या संत विचाराने समाज प्रबोधन करणारे भारुड कार्यक्रम. सायं ८ वा. ह.भ.प ज्ञानसिंधु राम महाराज डोंगरे यांचे सुश्राव्य किर्तन होईल. बुधवार दि.८ रोजी सायंकाळी ६ वाजता तालुक्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या आईच्या मातृपुजन सोहळा होणार असून या मातृपूजन सत्कारमूर्ती सौ.संजिवणी नारायणराव करपे,सौ.रूक्मीणबाई परभणे, सौ.व्दारकाबाई मस्के, सौ.शांताबाई कल्याणराव तौर, सौ. रूक्मीणबाई मोटे, श्रीमती. शांताबाई खंडागळे, नानीबाई वाघमोडे, सौ.प्रिती संतोष गर्जे, जयश्री दाभाडे, विजयमाला कांबळे आदींचा या कार्यक्रमात मातृपूजन होणार आहे. तर संध्याकाळी ८ वाजता ह.भ.प कान्होबा महाराज देहुकर यांचे सुश्राव्य किर्तन होईल. गुरूवार दि.९ रोजी सायंकाळी ६ वाजता ओम बोंगाणे यांची संतवाणी हा कार्यक्रम. संध्याकाळी ८ वाजता रामायणाचार्य ह.भ.प रामराव ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होईल. शुक्रवार दि.१० रोजी सकाळी १० वाजता स्वरकल्याण संगित विद्यालय अभंगवाणी हा कार्यक्रम. त्यानंतर ह.भ.प जनार्धन महाराज गुरु निगमानंद महाराज यांचे अमृत तुल्य काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताचे अध्यक्ष दादासाहेब घोडके, ह.भ.प अक्रुर महाराज साखरे, प्रकाश महाजन साठे , माधव चाटे, उत्तम नाना मोटे यांच्यासह संयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.