विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात कुठेही असा पण शाळेशी असलेली नाळ तोडू नका, व शाळेसाठी आपले कर्तव्य विसरू नका

विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात कुठेही असा पण शाळेशी असलेली नाळ तोडू नका, व शाळेसाठी आपले कर्तव्य विसरू नका
टाकळीभान -प्रतिनिधी – विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात कुठेही असा पण शाळेशी असलेली नाळ तोडू नका, व शाळेसाठी आपले कर्तव्य विसरू नका आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभारलेल्या संस्थेला मदत म्हणून भक्कमपणे पुढे येण्याचा प्रयत्न करा असे आवाहन रयतचे माजी शिक्षक एस बी चव्हाण सर यांनी केले
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 1987- 88 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या भव्य प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला तेव्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण सर बोलत होते
पुढे बोलताना चव्हाण सर म्हणाले की, 35 वर्षानंतर या शाळेत येण्याची संधी मिळाली त्यामुळे तुमचे सर्वांचे प्रेम पाहून मी पूर्णपणे भारावून गेलो आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावल्यामुळे आज माझे विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर, वकील,इंजिनिअर व उद्योजक बनले याचा मला सार्थ अभिमान आहे पण विद्यार्थी मित्रांनो खूप मोठे व्हा पण आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपण काही तरी देणे लागतो हे मात्र कदापी विसरू नका असाही मोलाचा सल्ला माजी विद्यार्थ्यांना केला
यावेळी बापूसाहेब पटारे, पालकर सर,पळसकर सर, पांढरकर सर हुंडेकरी सर, आव्हाड सर खैरे सर,गोतीस सर, वाकचौरे सर, श्रीमती नसीम शेख, जे डी शेख सर, आढाव सर आदींनी मनोगत व्यक्त केले
उपस्थित वर्षानंतर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन स्नेह मेळावा घडवून आणला प्रारंभी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले 35 वर्षानंतर माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी एकमेकांना भेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात आनंद दिसून येत होता. आपल्याला शिकवणारे कै. शिक्षक व आपल्या बरोबर शिक्षण घेणारे कै विद्यार्थी यांना माजी विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या एकमेकांच्या ओळखी करून दिल्या हो आपण सध्या काय काम करतो याविषयी थोडक्यात माहिती दिली.1987-88 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून जलशुद्धीकरण युनिट शाळेत भेट देऊन त्याचे भूमिपूजन केले. तसेच सर्व शिक्षकांचा सपत्नीक ड्रेस व साडी देऊन येथोचित सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थी अल्ताफ शेख यांच्यावतीने सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय घुले, दिलीप शिंदे,कारभारी चांडे, अल्ताफ शेख,मंदा पटारे, मंगल शेळके हिरा कोकणे,प्रमिला सूर्यवंशी, मीरा राऊत, शोभा काठेड, पद्मा मिरीकर, शारदा रणनवरे, उषा संत, शोभा मुळे,, अलका निधे, रंजना लेलकर, अलका लोखंडे राजू साठे दामू शिंदे संजय पवार दिलीप पारधे,संजय गुजर, सुनील रणनवरे मच्छिंद्र भराडे संजय रामटेके रामरतन गोड कचरू बनसोडे शामराव रणनवरे प्रा. विजय बोर्डे,विकास मगर,सर्जेराव चोरमल, राजेंद्र देवळालकर, अशोक बनकर, गणेश जठार आदींनी विशेष परिश्रम घेतले