खिर्डी वांगी शिवरस्ता झाला चिखलमय

खिर्डी वांगी शिवरस्ता झाला चिखलमय
–श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी वांगी रस्त्याची अत्यंत दयनीयअवस्था झाली असून.आपल्या दैनंदिन कामासाठी या रस्त्यावरून प्रवास करताना येथील ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून.आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या रस्त्यावरून प्रवास करताना आपला जीव मोठे धरून प्रवास करण्याची वेळ सध्या ग्रामस्थांवर आली आहे.रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे या रस्त्यावरून जाताना अनेक छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी देखील झाली आहे.तर शाळकळी मुलांना चिखल तुडवत शिक्षणासाठीचा संघर्ष करावा लागत आहे.किमान या रस्त्यावर मुरूम तरी टाकण्यात यावा अशी मागणी सध्या परिसरातील नागरिकांनी केली आहे.स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा अन्यथा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांना उपोषणाचा हत्यार उचलावा लागेल असं ग्रामस्थांनी यावेळी सांगितले आहे.हा रस्ता लवकर लवकर दुरुस्ती न झाल्यास ,आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थ भरत जाधव यांनी दिला आहे,