राजकिय

येणाऱ्या काळात आजित दादांच्या नेतृत्वाखाली नंबर एकचा पक्ष करुया – धनंजय मुंडे* 

*येणाऱ्या काळात आजित दादांच्या नेतृत्वाखाली नंबर एकचा पक्ष करुया – धनंजय मुंडे* 

 

*राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराला सुरुवात…*

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या वैचारिक मंथनातून येणाऱ्या काळात दादांच्या नेतृत्वाखाली नंबर एकचा पक्ष करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. 

 

मित्र कोण… शत्रू कोण हे गणित कळले नाही… ही कविता बोलत धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

 

काही लोकांकडून लोकशाही टिकली पाहिजे असे सांगितले जायचे मग ती पक्षातील असो, राज्यातील… मात्र जेव्हा पक्षातील लोकशाही अजितदादा पवार यांनी समोर आणली त्यावेळी दादांना खलनायक ठरवण्यात आले याबद्दल धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. 

 

प्रत्येक भूमिका घेतल्या गेल्या त्यावेळी खलनायक कोण तर अजितदादा ठरले गेले. स्वतः च्या नेतृत्वासाठी अनेक निर्णय घेतले गेले त्यावेळी अजितदादा चांगले होते परंतु पक्षातील 

लोकशाही टिकवण्यासाठी निर्णय घेतला तर ते खलनायक झाले आणि आज कोणपण टिका करत आहेत. काहींना दादांची जागा मिळवल्याचा भास होतो आहे असा टोला लगावतानाच कर्जत – जामखेड उमेदवारी घेण्यासाठी काहींनी भाजपकडून फिल्डिंग लावत होते. त्यांनी आमच्यावर टिका करावी अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ तेच वेळ नवी अजितदादांच्या विकासपर्वाची… त्यामुळे इथून विजय संकल्प घेऊन जायचे आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

 

अजितदादांची महाराष्ट्राला गरज आहे. दादा तुम्ही केलेले काम महाराष्ट्राला सांगितले नाही. मात्र अजितदादा यांनी परळी विधानसभा मला दिली नसती तर परळी विधानसभा राष्ट्रवादीकडे आला नसता म्हणून दादांचे योगदान कुणी विसरु शकत नाही असे सांगतानाच स्वर्गीय आबा आज असते तर त्यांनीही सांगलीत कुणाचा किती त्रास होतो आहे हे सांगितले असते असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

 

दादांच्या समोर महाराष्ट्राचा विकास आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आपल्याकडे कोहिनूर हिरा असताना आपण बॅकफूट जायचे नाही तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील शिबीरातून फ्रंटफूटवर येऊन काम करायचे आहे असा आशावाद कार्यकर्त्यांमध्ये धनंजय मुंडे यांनी भरला. 

 

वैचारिक मंथन शिबीरामध्ये पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, संजय मिश्किन यांनी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. तर दुपारच्या सत्रात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, रुपाली ठोंबरे, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, अमेय तिरोडकर आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. 

 

शिबीराच्या सुरुवातीला ध्वजारोहण राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते पार पडले. 

 

यावेळी वैचारिक मंथन शिबीरामध्ये पक्षाचे अधिकृत गाणेही प्रसारित करण्यात आले. 

 

या वैचारिक मंथन राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सेवादल अध्यक्ष राजेंद्र लावंघरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नायकवडी आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, युवक, युवती, महिला, विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे