महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब सर्वसामान्य माणसाला विविध विभागातून मदत होईल याकडे लक्ष असूद्या! – सुनील ठोसर

*मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब सर्वसामान्य माणसाला विविध विभागातून मदत होईल याकडे लक्ष असूद्या! सुनील ठोसर प्रदेश सरचिटणीस*

 

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मार्फत,

मा.श्री विभागीय आयुक्त साहेब संभाजीनगर माननीय श्री. सूनिलजी केंद्रेकर साहेब यांचेमार्फत निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील विविध विभागातील जनतेच्या प्रश्नाबाबत खालील मागण्या विषयी विनंतीपूर्वक सविनय आपणास कळविण्यात येते की १) सन 2020 चा राज्यातील पीकविमा तत्काळ सरसकट देण्यात यावा २) शासनाने मुद्रांक शुल्क घेतलेले सर्व मिळकतीचे खरेदी विक्री व्यवहार कोर्टाने निकाल दिलेले असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बंद आहेत अनेकांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले तरीही सरकारने वीणा विलंब सुरळीत व्यवहार सुरू करावे ३) निराधार, संजय गांधी, श्रावणबाळ पेन्शन योजना राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात महिन्याला एक दिवस निराधारांच्या प्रश्नावर जनता दरबार घेण्यात यावा.४) शासकिय कर्मचारी व अधिकारी यांना आपल्या कोर्टरवर राहणे बंधनकारक करण्यात येऊन सर्व कोर्टर दुरुस्ती करण्यात यावेत ५ ) विविध घटकांच्या आंदोलनातील सर्व बोगस व राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे ६) आजपर्यंत सर्व कर्जमाफी मध्ये एकदाही लाभ न मिळालेल्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा योजना राबविण्यात यावी. ७) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला पण ग्रामसभा न घेणाऱ्या ग्रामपंचायत बरखास्त करण्यात याव्यात ग्रामपंचायत पातळीवर झालेल्या भ्रष्टाचार रोखण्यासाठी दोशिवर ४२० प्रमाणे गुन्हे तात्काळ कार्यवाही व्हावी ८) गावं व तालुका पातळीवर घरकुल घोटाळा राज्यातील सर्व पंचायत समिती मध्ये जनता दरबार व अधिकारी बिशी मीटिंग घेऊन दोशीवर कारवाही व पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा ९) राज्यातील सर्व दिव्यांगाना असणारी बिजभांवल २५० हजार योजना विनाअट राबविण्यात यावी तसेच दिव्यांगना बस मोफत करण्यात यावी १०) राज्यातील शेतकरी आत्महत्या वारसांचा शिक्षण खर्च सरकारने करावा ११) राज्यातील विविध ठिकाणी विकासकामे चालू आहे पण निकृष्ट दर्जाची आहेत अश्या गुत्तेदाराचे लायसन रद्द करून देयके स्थगित करून कठोर शासन करावे १२) राज्यातील शेत,पांदन,शिव रस्ते बोगस झाले आहेत त्याची विभागीय अधिकारी यांचेकडे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे १३) सर्वच विभागातील अधिकारी व कुटुंबातील संपत्तीची चौकशी करण्यात यावी १४) महावितरण कंपनीने लाखो कोटीला फसविलेले अहवाल सरकार कडे असल्यामुळे व पोल, तारा, डिपी ची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी तसेच वीजबिल वाढीचा प्रस्ताव तत्काळ मागे घेण्यात यावा अतिरिक्त वीज बिले देणारे अधिकारी सेवेतून कायमचे बडतर्फ करण्यात यावे १५) जिल्हा परिषद शाळा डिजिटल कराव्यात, शाळा खोल्या दुरस्त करण्याच्या नावाखाली फक्त कार्यकर्ते जगले अनेक ठिकाणी उघड्यावर व झाडाखाली बसतात सर्वांना सुरळीत शालेय सुविधा त्वरित कारवाई करण्यात यावी तसेच शिक्षक सवलती सर्व विद्यार्थ्यांना समान करण्यात याव्या यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या बंद होतील शालेय विद्यार्थी यांना बस सेवा, आरोग्य सेवा मोफत करण्यात यावे १६) राज्यातील सर्व धर्म, पंथ,मठाधिपती, वारकरी शिक्षण संस्था पुजारी, विनेकरी, टाळकरी यांना संगीत कला मानधन पेन्शन 5000 लागू करण्यात यावी १७) सर्व आरोग्य केंद्र तत्काळ चालू करून अनेक ठिकाणी आरोग्य केंद्र जीर्ण झाली तरी लोकांच्या सेवेसाठी नाहीतसेच गैर हजर असणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी १८) शेतकऱ्यांना देण्यात येणारी व्याज सवलत योजना अनेक बँकेनी कागदपत्रे देऊनही व्याज सवलत दिलेली नाही अस्या सर्व बँक अधिकाऱ्यावर कार्यवाही करून शेतकरी बांधवांना व्याज सवलत देण्यात यावी १९) शेतकरी बांधवांना देण्यात येणारी सिंचन योजना कंपनी उत्पादक कंपनी मार्फत सबसिडी राबविण्यात यावी २०) राज्यातील सर्व नोकर भरती कोणतीही अट, आरक्षण न ठेवता शैक्षणिक ‌भरत्या तत्काळ सुरू करून याची जबाबदारी सरकारने घ्यावी २१)पैठण तालुक्यातील नवंगाव येथे गुलाम रसूल शेख वय ५० यांचा काँक्रिट मशीन मध्ये मृत्यू झाला व सदरील काम हे रोजगार हमी योजनेतून असताना दोशिवर कार्यवाही करून ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी २२) राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर लिंपीची लस उपलब्ध करून देण्यात यावी तसेच स्थानिक प्रशासन वर जबाबदारी द्यावी राजकीय हस्तक्षेप होऊ नये २३) खाजगी रुग्णवाहिका मानधन देऊन वार्षिक डिझेल देण्यात यावे सर्व मागण्या अपनाकडे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते, लाभार्थी यांचे वतीने विनंती पूर्वक करण्यात येत असून सहानुभुतीपूर्वक आमच्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे अन्यथा मंत्रालयासमोर बैल गाडी मोर्चा काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील निवेदक सुनील नानासाहेब ठोसर प्रदेश सरचिटणीस रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी आदींनी कळविले आहे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे