नारळाची बाग जुना धबधब्यात डिग्रस गावच्या सचिन इंद्रभान गावडे वय २३ या तरुणाचा मृतदेह आढळला.

नारळाची बाग जुना धबधब्यात डिग्रस गावच्या सचिन इंद्रभान गावडे वय २३ या तरुणाचा मृतदेह आढळला.
राहुरी तालुक्यातील राहुरी कृषी विद्यापीठ येथे आज 2 वाजेच्या दरम्यान विद्यापीठ परिसर ते गावडे वस्ती नारळाची बाग जुना धबधब्यात डिग्रस गावच्या सचिन इंद्रभान गावडे वय २३ या तरुणाचा मृतदेह आढळला.
सदरचा युवक हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.
रात्री चार बारा ची ड्युटी करून घरी परतत असताना सदरचा युवक बेपत्ता झालेला होता.
दरम्यान बेपत्ता तरुणाच्या शोध मोहिमेदरम्यान या तरुणाची मोटरसायकल मोबाईल व पाण्याच्या कडेला एक बूट आढळून आले त्यानुसार या तरुणाचा डोहामध्ये शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.
सदर मृतदेहाचे हात घडी बांधलेल्या अवस्थेत होते व त्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या यावरून नक्कीच घातपात असल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे.
त्याच्या वडिलांनीही घातपाताचा झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
जोपर्यंत आरोपीचा शोध लागत नाही तोपर्यंत अंत्यविधी होऊ देणार नाही असे मृत तरुणाचे वडील इंद्रभान गावडे यांनी सांगितले आहे.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे पाठवण्यात आलेला .
पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.