टाकळीभान येथे “अशोक” च्या उसतोडीचा शुभारंभ.

टाकळीभान येथे “अशोक” च्या उसतोडीचा शुभारंभ.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या उसतोड कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार दि.२५ आॅक्टोंबर रोजी येथील प्रगतशील शेतकरी अशोकचे माजी संचालक भाऊ पाटील थोरात यांच्या शेतातील उसाच्या तोडीने करण्यात आला.
माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरूवात होत आहे. टाकळीभान गटात उसतोड कामगारांचे जथ्थे सध्या येण्यास सुरूवात झाले आहे. टाकळीभान गटात नूकतेच अशोकचे माजी संचालक भाऊ पाटील थोरात यांच्या गट नं.१७ मधील उसाच्या तोडीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या उसतोड शुभारंभ प्रसंगी अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळूंके, माजी संचालक दत्तात्रय नाईक, लोकसेवा विकास आघाडीचे शिवाजीराव शिंदे, माजी संचालक भाऊ पाटील थोरात, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, विजय धुमाळ, संचालक यशवंत रणनवरे, शंकरराव पवार, रावसाहेब वाघुले, दत्तात्रय मगर, ग्रा.पं.सदस्य मयुर पटारे, सुनिल बोडखे, दत्तात्रय पटारे, मच्छिंद्र बोडखे, भाऊसाहेब पटारे, भैय्या पठाण, भागवत रणनवरे, बाळासाहेब आहेर, उत्तम पवार, शिवाजी पवार, दत्तात्रय बोडखे, कुशाबा पवार, भाऊ जाधव, महेश लेलकर, सुभाष येवले, अजित थोरात, राजेंद्र पवार यांचेसह उसतोड कामगार उपस्थित होते.