आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित योजनेचा महीलांनी लाभ घ्यावा -नवले

आरोग्य विभागाच्या माता सुरक्षित योजनेचा महीलांनी लाभ घ्यावा -नवले
महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौ उत्सवानिमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही योजना राबविण्यात येत असुन महीलांनी या योजनेचा लाभ घेवुन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे अवाहन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी केले आहे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेचा शुभारंभ बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती अमोलिक,तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे,संदीप शेरमाळे बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँक्टर देविदास चोखर डाँक्टर मृण्मयी कुटे डाँक्टर मंजुश्री जाधव, गावकरी पतसंस्थेचे संचालक सचिन वाघ, सागर ढवळे,किशोर कदम, बापूसाहेब वडितके उपस्थित होते आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की बेलापुर ग्रामपंचायतीचे शतक महोत्सव आहे त्या निमित्ताने ग्रामपंचायती मार्फत महीलांचे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे या वेळी माहीती देताना डाँक्टर देविदास चोखर म्हणाले की आरोग्य विभागाच्या वतीने १८ वर्षावरील सर्व महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे नऊ दिवस नवविवाहीत गरोदर स्तनदा तसेच वयोवृद्ध महीलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे सर्व महीलांची आरोग्य तपासणी करुन महीला सबलीकरण करण्याचा शासनाचा मानस आहे या तपासणीत गंभीर आजार असणाऱ्या महीलाना तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येणार असुन या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बारा गावे येत असुन सहा उपकेंद्र आहेत त्या सर्व ठिकाणी ही तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याचे डाँक्टर चोखर यांनी सांगितले या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे स्वाती अमोलीक यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी आरोग्य सहाय्यक प्रशांत गायकवाड श्रीमती ग्रेटा कदम श्रीमती नेहुलकर रत्ना नागले आशा कुताळ महेंद्र मेश्राम गणेश टाकसाळ संतोष शेलार श्रीमती सय्यद पंडीत किशोर कदाम दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित होते