त्यामधून उत्सर्जित होणारी किरणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात.

त्यामधून उत्सर्जित होणारी किरणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात.
कोजागिरी पौर्णिमा या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अतिशय जवळ आलेला असतो. त्यामुळे त्यामधून उत्सर्जित होणारी किरणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत जागरण करतात.त्याकरिता महिलांना आरोग्य व आनंददायी संदेश देण्यासाठी सामाजिक एकता विचारमंच महिला मंडळ बोंबले पाटील नगरच्या वतीने सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर याठिकाणी महिला, विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता सांस्कृतिक महोत्सव व विविध स्पर्धात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड (साळवे),सौ. विद्या जैत,सौ अश्विनी कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी नृत्यांगना कु. सहर्षा साळवे हिने अनेक मनमोहक नृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. महिला गटात संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम क्रमांक सौ.जयश्री वायाळ, द्वितीय क्रमांक सौ. वर्षा साळवे, विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक आर्यन वायाळ, द्वितीय क्रमांक कु सहर्षा साळवे, पुरूष गटात प्रथम क्रमांक संतोष कुलकर्णी, द्वितीय क्रमांक राहुल जैत, नृत्य सादरीकरण कु.शिवानी कुलकर्णी,कु प्राप्ती जैत,कु. अमिषा वायाळ,कु. श्रुती जैत,कु सहर्षा साळवे,कु. खुशी कुलकर्णी कु श्रावणी कुलकर्णी,कु मैत्री बारापत्रे,कु राणी बागुल,यश जैत,धृव जैत,आफान शेख,यश कुलकर्णी कु यादव,रूची लाड, स्वरा लाड, यांनी सहभाग नोंदविला.
याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, भारत मुक्ती मोर्चाचे एस.के.बागुल,शाकिर शेख सर,बालिका विद्यालयाचे अध्यापक अनिल जगताप सर, नितीन कुलकर्णी, जेष्ठ नागरिक सौ. विमल जैत,सौ. नजमा शेख,सौ वायाळ आजी,सौ.प्रमिला बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.वर्षा साळवे,सौ विद्या जैत,सौ अश्विनी कुलकर्णी, ज्योती जगताप,जयश्री वायाळ,मेघना कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी,सविता म्हस्के,कोमल बारापत्रे,सीमा यादव, रंजना जैत, स्वाती लाड,सविता बोंबले, कल्याणी बोंबले,सौ.रेहाना शेख इ.नी विशेष परिश्रम घेतले.