निवडणुकांच्या धरतीवर टिळक भवन मुंबई येथे विविध जिल्ह्यातून महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा

निवडणुकांच्या धरतीवर टिळक भवन मुंबई येथे विविध जिल्ह्यातून महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा
येत्या पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या धरतीवर टिळक भवन मुंबई येथे विविध जिल्ह्यातून महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव तथा नांदेड शहर काँग्रेस पक्ष निरीक्षक श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे उपस्थित होत्या.
छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर बैठकीस सुरुवात करण्यात आली. सदर बैठकीसाठी राष्ट्रीय महिला काँग्रेसचे अध्यक्ष नेटा डिसूजा तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे प्रदेश विविध सेलच्या अध्यक्ष उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ. वंदनाताई म्हणाल्या की प्रदेश पातळीवर काम करताना जबाबदारी काम करावे लागते. पदावर काम करताना महिलांचे संघटन, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करता आले. हो घातलेल्या निवडणुकांसाठी मात्र उमेदवारांची निवड करून राज्यात व देशात काँग्रेसचे सरकार आलेच पाहिजे या अनुषंगाने काम सुरू आहे. देशाचे काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, खा. राहुलजी गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, नेतृत्वाखाली राज्यात व देशात काँग्रेसचे सरकार आल्याशिवाय आता राहणार नाही. आदरणीय खा.राहुलजी गांधींनी केलेल्या भारत जोडो यात्रेच्या प्रसंगी विविध राज्यातून लोक काँग्रेसला जोडले गेले आहेत. सर्वत्र काँग्रेसला चांगले दिवस आले आहेत. आमचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली प्रदेश पातळीवर अत्यंत जोमाने काम सुरू आहे.
सुदर कार्यक्रम टिळक भवन, मुंबई येथे संपन्न झाला त्या बोलत होत्या. तसेच याप्रसंगी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी नेटा डिसूजा व संध्याताई सव्वालाखे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.