महाराष्ट्र

लाखोंना दृष्टी देणारे दृष्टीदुत डॉक्टर तात्याराव लहाने

लाखोंना दृष्टी देणारे दृष्टीदुत डॉक्टर तात्याराव लहाने

 

ज्ञान प्राप्त करणे आणि प्राप्त केलेला ज्ञान नम्रपणे कुठल्याही प्रकारचा मी पणा गर्व अहंकार न करता निस्वार्थी पणे लोककल्याणासाठी समर्पित करण खूप कमी लोकांना जमत.ते म्हणजे अशा खूप कमी आणि खास लोकांपैकी एक महान नेतृत्व म्हणजे डॉक्टर तात्याराव लहाने ज्यांना आपण अनेकांना दृष्टी देणारे देवदूत म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. दृष्टी हि सृष्टी पाहण्याची सर्वतम व्यवस्था आहे. दृष्टी जर व्यवस्थित असेल तर पृथ्वीवरील सर्व प्रकारचे सौंदर्य चांगल्या वाईट बाबी पाहता येतात अनुभवता येतात . दृष्टी चे रक्षण करण्यासाठी आणि अनेकांना दृष्टी देण्यासाठी अनेक नामवंत तज्ञ डॉक्टर कार्यरत असतात परंतु या पैकी डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या कारकीर्दीत लाखो लोकांच्या डोळयावर योग्य शस्त्रक्रिया करून त्यांना यशस्वी दृष्टी प्रदान केली. लातूर आणि बीड च्या सीमेवर असणाऱ्या छोट्याशा खेडेगावात डॉक्टर तात्याराव लहाने यांचा जन्म झाला कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण खूप कठीण आणि संघर्षमय परिस्थितीत पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण करत असताना परिस्थिती बेताची असल्याने वेळप्रसंगी मजुरीही करावी लागली. परंतु दैदिप्यमान इच्छाशक्ती आणि जीवनामध्ये काहीतरी घडण्याची स्वप्न उराशी बाळगून प्रवास करणारे दिग्गज संघर्षाला संकटाला घाबरत नसतात .त्याच पद्धतीने डॉक्टर तात्याराव लहाने साहेब यांनी संघर्षातून आपलं शिक्षण पूर्ण करून डॉक्टर झाले. आणि डॉक्टर झाल्यानंतर मात्र आपल्या पदाचा आणि ज्ञानाचा वापर हा पैसे आणि प्रतिष्ठा कमावण्यासाठी न करता लोककल्याणासाठी केला अविरत जनसेवेचा वसा आणि वारसा खांद्यावर घेऊन जनसेवा करत असताना दिवस-रात्र सुट्टी कार्यालयीन वेळ संपली असं कधीही पाहिलं नाही. उलट आपल्या जीवनातील जास्तीत जास्त कालावधी हा लोक कल्याणासाठी कसा समर्पित करता येईल. आणि आपण लोक उपयोगी कसे ठरू हाच उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक लोकांना दृष्टी देण्यासाठी प्रयत्न केले . आज जागतिक दृष्टी दिन आहे त्यानिमित्ताने अनेकांना दृष्टी देणारे देवदूत दृष्टी दूत डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या कार्याला सलाम आणि जागतिक दृष्टी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा .

 

गणेश खाडे

 

 संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बाल संस्कार शिबिर आध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे