वनक्षेत्र परिसरात वणवा पेटला, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हानी होण्याचा संभव*

*आळंदीच्या वनक्षेत्र परिसरात वणवा पेटला, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हानी होण्याचा संभव*
आळंदी च्या चाकण घाटातील भर दुपारच्या वेळेस दुपारी बारा वाजता वनवा पेटलेला दिसला, यामुळे धुराचे मोठे लोट रोडवर मुख्य रस्त्यावर येताना दिसले, आळंदीच्या चाकण घाटातील परिसरात मोठ्या प्रमाणात वनवा पेटला होता,मुळात वनविभागाच्या हद्दीतील हा प्रभाग असल्याने, या ठिकाणी लक्ष देण्याची जबाबदारी वनक्षेत्र विभागाची आहे, सदर वनपरिक्षेत्रात वनवा पेटल्यामुळे बऱ्याच प्रमाणात सरपटणाऱ्या विविध जातीचे प्राणी मृत्युमुखी पडल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याचबरोबर आळंदीच्या चाकण घाटातील वनविभागाचे क्षेत्रांमध्ये बऱ्याच वेळा बिबट्या, कोल्हे, तरस, मोर,लांडोर, मोठ्या घरचे मुंगूस विविध जातीचे साप यांचे नागरिकांना दर्शन झालेले आहे, सदरच्या वनवा पेटल्यामुळे या वन्य प्राण्यांनाही जीवित हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, आळंदीच्या चाकण घाटात रस्त्याने जाताना मोठ्या प्रमाणात राडारोडा, घाण, कचरा , रस्त्याच्या दुतर्फा टाकून विद्रूपीकरणात भर घातली जात आहे, अस्ताव्यस्त विखुरलेला कचरा टाकलेला दिसून येत आहे, पूर्वी हा परिसर स्वच्छ, सुंदर, निसर्गरम्य, वाटायचा परंतु याकडेही वन विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे,सदर पेटलेल्या वनव्यामुळे मोठ्या प्रमाणात वन्यजीव प्राणी, सरपटणारे प्राणी, यांची हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच सामाजिक वनीकरण संकल्पनेतून विविध जातींच्या झाडांची लागवड शासनामार्फत करण्यात आली होती,या वनव्यामुळे ती झाडे नष्ट होतात की काय ही शंका उपस्थित होत होती, मोठ्या प्रमाणात पेटलेल्या वनव्याचा धूर मुख्य रस्त्यावर, रहदारीच्या बाजूने येत, असल्याने नागरिकांचे सहज लक्ष या मोठ्या परिसरात आग लागली कडे जात होते,