डिग्रस सोसायटी अखेर बिनविरोध/ मा. सरपंच पवार/व भिंगारदे यांना अखेर आले यश

डिग्रस सोसायटी अखेर बिनविरोध/ मा. सरपंच पवार/व भिंगारदे यांना अखेर आले यश
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या व परिसरात नावलौकिक असलेल्या डिग्रस विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक डिग्रस गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी भिंगारदे व माजी सरपंच विद्यमान बाभळेश्वर दूध संघाचे संचालक व मा.खासदार प्रसादराव तनपुरे यांचे कट्टर समर्थक श्री रावसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. डिग्रस सेवा संस्थेच्या एकूण 13 जागेसाठी दोन पॅनेलमधून एकूण 41 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. जर संस्थेची निवडणूक झाली तर निवडणूक खर्च कामी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल म्हणून सदरची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका श्री शिवाजी भिंगारदे यांनी श्री रावसाहेब पवार यांच्याकडे मांडली. त्यांच्या विनंती ला व कोरोना आजाराची परिस्थिती लक्षात घेता तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी पूर्वी गावात राजकीय संघर्ष होऊ नये व गावात राजकीय शांतता राहावी या सर्व बाबींचा विचार करून कार्यकर्त्यांची व सभासदांची निवडणूक व्हावी ही तीव्र स्वरूपाची इच्छा असताना सुद्धा विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध करून गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील नवीन कार्यकर्त्यांना संचालक पदाची संधी देऊन राज्याचे मंत्री माननीय नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या विचारांना मानणारे दहा सदस्यांना संस्थेत घेऊन शिवाजी भिंगारदे व रावसाहेब पवार या दोघांनी एका विचाराने संस्था बिनविरोध केली. संस्थेचे बिनविरोध सदस्य खालीलप्रमाणे – प्रकाश तारडे सर शिवाजी भिंगारदे , सोपानराव गावडे,सौ सुमन ताई कोकाटे , रविराज भिंगारदे , शशिकला भिंगारदे, बाळकृष्ण गावडे, अशोक जाधव, जगन्नाथ गावडे,मोहन बनसोडे ,लिलाबाई देशमुख,ज्ञानेश्वर भिंगारदे, राणी भिंगारदे
संस्था बिनविरोध होणे कामी विद्यापीठ कृषी विज्ञान संस्थेचे माजी चेअरमन श्री मच्छिंद्र बेल्हेकर यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला त्यांना याकामी डिग्रस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माननीय केशवराव बेलेकर सुभाष बेलेकर श्री मोहनराव काळे, संदीप राव कोकाटे, काका गावडे, बापुराव मोरे, दत्ता पटेकर, भारत जाधव इ.यांनी मोलाचे सहकार्य केले.