भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त ग्रामस्थांना नवीन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त ग्रामस्थांना नवीन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त ग्रामस्थांना नवीन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले आहे.
टाकळीभान ग्रामपंचायतच्या स्व. गोविंदराव आदिक सभागृहात आज दिनांक १७ रोजी नवीन रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश राठी होते.
यावेळी गणेश राठी, माजी सभापती नानासाहेब पवार, भाजपा तालुका अध्यक्ष दिपक अण्णा पटारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रेखाताई रिंगे यांचे हस्ते ग्रामस्थांना नवीन रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.
येथील भाजपाचे मुकुंद हापसे, नारायण काळे
आदिंनी ज्या ग्रामस्थांना रेशनकार्ड नव्हते आशा या लोकांसाठी शिबीराचे आयोजन करून नवीन रेशन कार्ड मिळण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र, फार्म भरून हे प्रकरण तहसिल कार्यालयात सुपुर्त करून त्याचा पाठपुरावा करून ही प्रकरणे मार्गी लावली आहेत त्यानुसार आज लाभार्थिनींना नवीन रेशनकार्ड वाटप करण्यात आले आहे.
यावेळी कैलास पटारे, प्रणव भारत, महेश खरात, मुकुंद लंबडे, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, शंकर शिंदे, बाळासाहेब शेळके, सतीष रणनवरे, भारत गुंजाळ, संजय पवार, अविनाश लोखंडे, नारायण काळे, मुकुंद हापसे, ऋषिराज हापसे राहुल म्हस्के, रोहित वाघुले, अर्जुन राऊत आदी उपस्थित होते.