टिपरे’ लोककला जतन करण्याचे काम करू – विजयसिंह पंडित*

*गेवराईची ‘टिपरे’ लोककला जतन करण्याचे काम करू – विजयसिंह पंडित*
टिपरे आणि सोंग या लोककलेला 100 हून अधिक वर्षांचा पारंपारिक वारसा आहे. गेवराई शहराची लोककला जतन करण्याचे काम शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करून देशभरात टिपरे महोत्सवाचे गाव म्हणून गेवराईची ओळख होईल असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवातील विजेत्यांना विजयसिंह पंडित यांच्याहस्ते रोख पारितोषिके देवून गौरविण्यात आले. यावेळी महिलांसह इतरांची लक्षणीय उपस्थिती होती.
माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठानकडून गेवराई शहरात नेत्रदिपक टिपरे महोत्सवाचे आयोजन दि.3 ऑगस्ट रोजी करण्यात आले. उद्घाटन आयोजक विजयसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संपादक गंगाधर काळकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, परिक्षक ॲड.सुभाष निकम, विलास सोनवणे, प्रा.राजेंद्र बरकसे, प्रशांत रुईकर आणि प्रकाश भुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेवराई शहराला टिपरे आणि सोंग या लोककलेचा मोठा वारसा आहे. 100 वर्षांहून अधिक काळ टिपरे या संस्कृतीचे जतन शहरातील कलाप्रेमींनी केले आहे. शहरातील राजकीय नेतृत्वाची उदासिनता आणि नगर परिषदेकडून या कलाविष्काराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहराचा लोककलेचा वारसा लोप पावत चालला होता. विजयसिंह पंडित यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाने याकडे लक्ष केंद्रीत करून सन 2019 पासून गेवराई शहरात टिपरे महोत्सावाचे आयोजन केले. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नेत्रदिपक व पारंपारिक टिपरे आणि सोंग महोत्सवाचे शिस्तबध्द आयोजन शहरात होत असल्यामुळे कलाकारांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, शहरातील टिपरे आणि सोंग उत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून ही परंपरा जतन करून हा टिपरे महोत्सव सातत्याने घेतला जाईल. पुढील काळात महोत्सवामध्ये महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली जाणार असून अधिक व्यापक पध्दतीने हा टिपरे महोत्सव घेतला जाईल. टिपरे आणि सोंग कला येणाऱ्या पिढीला कळावी म्हणून या महोत्सवाचे आयोजन केले आहे. गेवराई शहरातील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. परिक्षकाच्या वतीने ॲड.सुभाष निकम, प्रशांत रुईकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
अतिशय शिस्तबध्द पध्दतीने टिपरे खेळून विविध संघांनी उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित यांनी अतिशय नियोजनपूर्वक या स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील कलावंत विविध वेषभुषा घेवून आपल्या संघामध्ये सहभागी झाले होते. विविध कलाकारांनी वेगवेगळे सोंग घेवून प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या. हा महोत्सव पाहण्यासाठी गेवराई शहरातील लहान मुले-मुली, महिला, तरुण आणि वयोवृध्द जनतेने प्रचंड गर्दी केली होती. शहरातील बाजारतळावर सायं.7 वाजता झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्याहस्ते करण्यात आला. टिपरे स्पर्धेचा प्रारंभ धर्मवीर संभाजी संघाने केला, या स्पर्धेत एकुण 11 संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा निकाल परिक्षक ॲड.सुभाष निकम यांनी जाहिर केला.
टिपरे स्पर्धेतील सांघिक प्रथम पारितोषिक 15,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह संतोषनगर येथील ओम ग्रुप ने पटकावले, सांघिक द्वितीय पारितोषिक रोख 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह संभाजी चौक येथील संभाजीराजे क्रीडा मंडळाने तर सांघिक तृतीय पारितोषिक 5,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह मोटे गल्ली येथील झुंजार क्रीडा मंडळाने पटकावले. उत्कृष्ट कला सादर करणारा संघ यामध्ये प्रथम पारितोषिक 3,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, शिवाजीनगर येथील क्रांती ग्रुपने आणि द्वितीय पारितोषिक 2,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, दाभाडे गल्ली येथील संघर्ष ग्रुपने तर तृतीय पारितोषिक 1,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह मेन रोड येथील क्रीडा मंडळाने पटकावले. उत्कृष्ट सोंगधारी कलावंतामध्ये प्रथम पारितोषिक 2,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह शिवराज ग्रुपच्या शहादेव निकम यांनी पटकावले, द्वितीय 1,500 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह संघर्ष ग्रुपच्या राजू गायकवाड यांनी तर तृतीय पारितोषिक 1,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह विमला विद्यामंदिरची विद्यार्थीनी कु.प्रणिता गायकवाड हिने पटकावले. उत्कृष्ट वाद्य वादनामध्ये प्रथम पारितोषिक 1,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह ओम ग्रुपच्या दयानंद सोनवणे यांनी तर द्वितीय पारितोषिक 700 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह संभाजी चौक येथील शंकर शिंदे यांनी तर तृतीय पारितोषिक 500 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह क्रांती ग्रुपच्या अमोल कांबळे यांनी पटकावले. टिपरे महोत्सवाचे आयोजक विजयसिंह पंडित आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी संघ आणि कलाकारांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी कलावंतांनी जल्लोष साजरा केला. कायक्रमाचे संचलन माधव चाटे यांनी केले. यावेळी गेवराई शहरातील नागरीक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.