येथील प्राचार्य विष्णु मोहनराव उर्फ व्हि.एम दरंदले सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

यशवंतराव गडाख साहेबांच्या विचाराने व्हि.एम दरंदले सरांनी
मुळा शिक्षण संस्था जपली-उदयनदादा गडाख.
(सोनई येथील प्राचार्य विष्णु मोहनराव उर्फ व्हि.एम दरंदले सर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.)
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई–शिक्षकांच्या गुणाचे व संस्काराचे अनुकरण मुले करतात.सोनई येथील विष्णु मोहनराव दरंदले ऊर्फ व्हि.एम सर यांनी मा.खा.यशवंतराव गडाख यांनी स्थापन केलेल्या मुळा एज्युकेशन संस्थेची तेहतीस वर्ष सेवा करून चांगली हुशार पिढी घडुन संस्थेला मोलाचे योगदान दिले याबद्दल मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष युवा नेते उदयनदादा गडाख यांनी सदिच्छा व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच मुळा एज्युकेश संस्थेचे संस्थापक मा.खा.यशवंतराव गडाख यांना अभिप्रेत असलेल्या विचाराने त्यांनी काम करत मुले घडवली.खा.यशवंतराव गडाख व मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा संस्थेचे रोपटे मोठे करण्यासाठी विष्णु दरंदले सर यांनी प्रामाणिक कष्ट केले.यामुळे पुढील काळात आम्ही हक्काने तुम्हाला बोलवु तसेच तुम्ही पण तुमच्या अडचणीत आम्हाला हक्काने हाक दयावी आम्ही उभे राहु असे युवा नेते उदयनदादा गडाख म्हणाले.
निमित्त होते सोनई येथील मुळा एज्युकेशन संस्थेच्या शिरेगाव खेडले हायस्कुलचे प्राचार्य विष्णु मोहनराव ऊर्फ व्हि.एम दरंदले सर यांच्या सेवापुर्ती समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुण व्यासपीठावर मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख होते.तर मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, मुळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव उत्तमराव लोंढे,पुणे विघापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य रविंद्र चोभे सर,सोनई पंचायत समिती गणाचे सदस्य कारभारी डफाळ , मुळा एज्युकेशन सोसायटी सहसचिव विनायक देशमुख,प्रशासकीय अधिकारी अशोक तुवर,जालिंदर घुले मामा अधीक्षक मुळा एज्युकेशन सोसायटी, पी.डी मोरे नियोजन अधिकारी मुळा एज्युकेशन सोसायटी त्याचप्रमाणे मुळा एज्युकेशन नियोजन समिती सदस्य दादासाहेब होन, दगू बाबा हवालदार ,डॉ.रमेश जाधव, शाळा समिती सदस्य नय्युम इनामदार,खेडले शिरेगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब केदारी, मोहम्मद इनामदार, सेवा सोसायटीचे सदस्य सूर्यभान आघाव,फकीर मोहम्मद हवलदार, प्रशांत तुवर उपसरपंच खेडले परमानंद,जावेद इनामदार,राजू महानोर, रमेश बनकर, राजेंद्र आघाव,फय्यूम इनामदार, कर्णासाहेब जाधव,राहुल बोर्डे,किसनराव दरंदले,भगवान जाधव,अॅड.शेखर दरंदले,बाबासाहेब शिरसाठ,बी.आर जंगले सर, एस डी दरंदले सर,ए.एस सोनवणे सर, आर.जे दरंदले सर, पी.जी बेल्हेकर सर, पी.एम गडाख सर, एस.डी नन्नवरे सर, आर.बी नवगिरे सर, काळोखे सर, लांघे सर, होन मामा, माऊली तुवर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी याप्रसंगी उपस्थित होते.तसेच विष्णु मोहनराव दरंदले सरांचा मिञ परिवार व नातेवाईक यावेळी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
*चौकट-सोनई येथील माझ्या शनैश्वर माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा संकल्पना ठेवून मी अकरा हजार रुपये देणगी स्वरूपात सेवा पुर्ती निमित्त देत आहे.माजी विघार्थी यांनी पण आपल्या शनैश्वर शाळेच्या इमारतीसाठी देणगी देवुन मुलांच्या शिक्षणाचा पाया बनावा -प्राचार्य विष्णु मोहनराव दरंदले सर.सोनई*