आर्य अकॅडमी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मांजरी येथे ज्योत फाउंडेशन यांच्यावतीने भव्य योगा शिबिर

आर्य अकॅडमी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मांजरी येथे ज्योत फाउंडेशन यांच्यावतीने भव्य योगा शिबिर आनंदात साजरा करण्यात आला
ज्योत फाउंडेशन या संस्थेमार्फत आर्य अकॅडमी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भव्य योगा शिबिर संपन्न झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून योगा ध्यान सूर्यनमस्कार योगासने प्रात्यक्षिक दाखवण्यात आली काळानुसार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाढता मानसिक तणाव व कमी झालेले शारीरिक व्यायाम यांचा अभाव यावर संवाद करण्यात आला ज्योत फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संस्थापक अजित पवार सर आंतरराष्ट्रीय योगा प्रशिक्षक व आर्य अकॅडमी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज प्राचार्य प्रतिभा जाधव मॅडम यांच्या संकल्पनेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रीन वड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री कृतवर्मा जाधव सर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य प्रतिभा जाधव मॅडम यांनी या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले उपस्थित योगा टीचर ओंकार बोडकर सर धनंजय पिंगट सर करन जवरे सर अमोल पवार सर यांनी उत्कृष्ट योग प्रशिक्षण दिले यावेळी अकॅडमी कॉलेज व स्कूलचे सर्व शिक्षक वृंदावन यांचे विशेष सहकार्य लाभले व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला