अपघात
करंजी बसस्थानकावर एस.टी. बसमध्येच प्रवाशाचा मृत्यु

करंजी बसस्थानकावर एस.टी. बसमध्येच प्रवाशाचा मृत्यु
पाथर्डीवरुन नगरकडे जात असलेल्या एस.टी. बसमध्येच एका प्रवाशाचा करंजी बसस्थानकावर मृत्यु झाल्याची घटना आज सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.
तारकपुर आगाराची पाथर्डी ते नगर (बस क्रमांक एमएच. एच. १४-बीटी- ३२२७) या बसमधून प्रवास करित असलेल्या एका प्रवाशाचा बसमध्येच करंजी बसस्थानकावर मृत्यु झाल्याची घटना घडली. या इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षादरम्यान असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. हा इसम गेवराई, जि. बीड येथील असुन त्याचे नाव नितीन उदावंत असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजले. सदर इसमाचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पाथर्डी येथील सिव्हील हाॅस्पिटलला नेण्यात आला असुन अधिक तपास पोलीस करीत आहेत.