कोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार? वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती..

कोरोना वाढतोय ! शाळा बंद राहणार? वर्षा गायकवाड यांनी दिली ही माहिती..
मागील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढलंय. कोरोनाची चौथी लाट येऊ नये, याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवून नुकत्याच काही सूचना केल्या होत्या.
राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढतांना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केलेल्या आहेत. शिवाय राज्यामध्ये मास्क सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे सांगण्यात येत आहे. तसेच परिस्थिती पाहून पुन्हा मास्कसक्ती करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
राज्यामध्ये काही शाळा येणाऱ्या दोन दिवसांत तर काही शाळा या 13 जूनपासून सुरु होत आहेत. मात्र कोरोना वाढत असल्यामुळे शाळा सुरु होणार की नाही, याबाबत पुन्हा एकदा शंका निर्माण झाली आहे.
शाळांसाठी ‘एसओपी’ जारी करु.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी पुन्हा नवीन नियमावली जारी करण्यात येण्याची जास्त शक्यता आहे. तसे संकेतच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेले आहेत. त्या म्हणाल्या, शाळांबाबत एसओपी तयार करण्यात येणार आहेत. तसेच शाळांमध्ये मास्क सक्ती करायची अथवा नाही, याचा सुध्दा निर्णय लवकरच घेतला जाईल. शिवाय शिक्षण विभागाकडून शाळांसाठी नवी कोविड नियमावली जारी करण्यात येईल असे शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या.
नवीन नियमानुसार होणार शाळा सुरू
पुढे बोलतांना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आवश्यक ती काळजी घेऊन शाळा सुरु करणार आहोत. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. त्यामुळे शाळा सुरु करताना नवी नियमावली असणार हे आता पक्के झाले आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा नव्या नियमाप्रमाणे सुरु करणार आहीत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदील..
राज्यातील कोरोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध शिथिल करताना राज्यात शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरू…
आजपासून पुन्हा शाळा सुरू होणार, पण राज्यातील ६२ टक्के पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत.
दोन वर्षांत चौथ्यांदा सोमवारी म्हणजेच आजपासून इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. परंतु सर्व शाळांना सरकारने कोरोना प्रोटोकॉलचे नियम पाळण्यास सांगितले आहे.मात्र, आजपासून मुंबई आणि पुण्यात शाळा सुरू होणार नाहीत. मुंबईत, जिथे बीएमसीने 27 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ऑनलाइन…