ब्राम्हणी सह इतर 6 गावाच्या पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ ह्यांची बिनविरोध निवड

ब्राम्हणी सह इतर 6 गावाच्या पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ ह्यांची बिनविरोध निवड
ब्राम्हणी सह इतर 6 गावाच्या पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी सडे गावाचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज पंचायत समितीच्या डॉ दादासाहेब तनपुरे सभागृहात आज तालुक्यातील ब्राम्हणी उंबरे सडे कुक्कडवेढे मोकळ ओव्हळ पिंपरी अवघड चेडगाव ह्या सात गावांची पाणी पुरवठा समिती स्थापन करण्यात आली ह्या समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी बाळासाहेब ढवळे. सहाय्यक गट विकास अधिकारी अनंत परदेशी,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपभियंता एस एस गडढे होते.सरपंच चंद्रकांत पानसंबळ ह्यांच्या नावाची सूचना ब्राम्हणीचे सरपंच प्रकाश बानकर ह्यांनी तर अनुमीदन चेडगावचे सरपंच संजय खरात ह्यांनी दिले.समितीच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत पानसंबळ ह्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीत ब्राह्मणी, सडे, उंबरे, चेडगाव, कुकडवेढे मोकळ ओव्हळ पिंपरी अवघड ह्या गावाचे सरपंच, प्रत्येक गावाचा एक प्रतिनिधी व ग्रामसेवक अशी 21 जणांची समिती गठीत करण्यात आली.या समितीमध्ये सडे गावाचे सरपंच चंद्रकांत प्रभाकर पानसंबळ, धनंजय शिवाजी पानसंबळ, ब्राह्मणी प्रकाश बाळकृष्ण बानकर (सरपंच )संतोष मोहन हापसे, उंबरे सुरेश दत्तू साबळे (सरपंच )बापूसाहेब जगन्नाथ दुशिंग उपसरपंच, चेडगाव संजय उत्तम खरात( सरपंच )संजय गंगाधर तरवडे (उपसरपंच ), मोकळ ओव्हळ भानुदास रोहिदास कदम (सरपंच )बापूसाहेब सोपान कदम, दिपक अण्णासाहेब मकासरे सरपंच रामभाऊ गोरक्षनाथ पानसरे, बापू लहानू तमनर( सरपंच )बापू शिवाजी पटारे व 7 गावाचे ग्रामसेवक ह्यांची समिती गठीत करण्यात आली.
श्री चंद्रकांत पानसंबळ ह्यांच्या निवडी बद्दल माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे सडे सेवा संस्थेचे चेअरमन डी आर पानसंबळ युवा नेते हर्ष तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते भारत भुजाडी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ आदिनी अभिनंदन केले.
ब्राम्हणी सह 7 गावाच्या पाणी योजनेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पानसंबळ ह्यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना पाणी पुरवठा समितीचे सर्व सदस्य.