समिंद्रा फौंडेशन व माऊली वृद्धाश्रम यांच्या वतीने कपडे अन्नधान्य किट साहित्य सायकली वाटप संपन्न

समिंद्रा फौंडेशन व माऊली वृद्धाश्रम यांच्या वतीने कपडे अन्नधान्य किट साहित्य सायकली वाटप संपन्न
समिंद्रा फौंडेशन महाराष्ट्र राज्य याच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य,सायकल गरजु लाभार्थ्यांना कपडे अन्नधान्य तसेच माऊली वृद्धाश्रमाच्या वतीने उबदार कपड्याचे मोफत वितरण माऊली वृद्धाश्रम येथे संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती पुरस्कार विजेते बबनराव तागड भाऊसाहेब वाघमारे रज्जाक पठाण रमाताई भालेराव अशोक दिवे उपस्थित होते या वेळी बोलताना समिंद्रा फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन गोरगरीबांना मोफत कपडे वाटप तसेच जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले जाते.
कोरोना काळात अनेकांना या फौंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे सहाय्य करण्यात आले होते महाराष्ट्रात अनेक शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांना आमचे जाहीर अवाहन आहे अडचण आली तरी आत्महत्येचा विचार कधीच करु नका समिंद्रा फौंडेशन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही केव्हाही हाक द्या परंतु आत्महत्येचा विचार मनात आणू नका समाजात निराधार मुली असतील तर त्यांचा विवाह करण्याची जबाबदारी संमिद्रा फौंडेशन घेईल सर्व सामान्य गोरगरीबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत समाज सेवेची प्रेरणा मला माझी आई लक्ष्मीबाई थोरात यांच्याकडून मिळाली असल्याचेही थोरात या वेळी म्हणाले.
या वेळी माऊली वृद्धाश्रमाचे सुभाष वाघुंडे म्हणाले कि अनेक दात्यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे कठीण असा हा अनाथ आश्रम चालविणे शक्य होत आहे आपण समाजाकडे सतत मगत असतो परंतु आपणही काही तरी दिले पाहीजे दान केले पाहीजे याच भावनेतुन आज समिंद्रा फौंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गरीब मुलांना शालोपयोगी साहीत्य तसेच गरम उबदार कपडे ब्लँकेट भेट देण्याचा निर्णय घेतलेला आहे .
या वेळी भालचंद्र कुलकर्णी जेष्ठ पत्रकार देविदास देसाई राष्ट्रपती पुरस्कार विजेते बबनराव तागड शंभुक वसतीगृहाचे अशोक दिवे सर रमाताई भालेराव रज्जाक पठाण भाऊसाहेब वाघमारे स्वाती बागुल आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी समिंद्रा फौंडेशनच्या वतीने तीन हजार कपडे २०० साड्या ९ सायकली ६० अन्नधान्य किट या साहीत्याचे मोफत वाटप करण्यात आले तर ५० विद्यार्थ्यांना वह्या ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या वेळी बागुल सर श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे ह भ प कृष्णानंद महाराज फौंडेशनचे अध्यक्ष सदाशिवा थोरात यांच्या आई लक्ष्मीबाई थोरात स्वाती बागुल परवीन शहा आदिसह नागरीक उपस्थित होते कार्याक्रमाचे सूत्रसंचलन शकील बागवान यांनी केले तर सौ कल्पना सुभाष वाघुंडे यांनी आभार मानले.