अखेर वांगी बुद्रुक ग्रामपंचायत विहिरीला मुहूर्त, परंतु सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची गाव तळ्यात घ्यावी लागली बैठक

अखेर वांगी बुद्रुक ग्रामपंचायत विहिरीला मुहूर्त, परंतु सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची गाव तळ्यात घ्यावी लागली बैठक.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक ग्रामपंचायत साठी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या निधीतून आठ लाख 19 हजार रुपये किमतीचे विहीर मंजूर झालेली होती परंतु एका ठेकेदाराने सहा महिन्यापूर्वी मी विहीर मंजूर करून आणली हे भासवत काम चालू केले होते. चुकीच्या ठिकाणी काम चालू झाले म्हणून उपसरपंच यांनी त्या कामाला विरोध करत ते काम बंद केले. हीच परिस्थिती आजही उपस्थित झाली सदर विहिरीचे काम ग्रामपंचायत करणार असतानादेखील संबंधित ठेकेदार व काही गाव पुढारी यांनी ग्रामसेवक उपसरपंच व सदस्य यांना कुठलीही कल्पना न देता रात्रीच मशीन आणून सकाळी काम देखील चालू केले याची माहिती उपसरपंच व सदस्यांना मिळाल्यावर ,ग्रामसेविका सौ बाचकर यांना विचारल्यावर काम कसे चालू झाले याबाबत मला कुठलीच कल्पना नाही अशी माहिती यांनी दिली. काम करण्याची वर्क ऑर्डर ग्रामसेवकांना आलीच नाही तर काम चालू झाले कसे व कोणी केले आणि काम परस्पर करणारे कोण. अंदाधुंद चालू असलेल्या कारभारावर अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने यांनी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत काम ग्रामपंचायत मार्फत करण्यात यावे व मी काम मंजूर करून आणले म्हणणाऱ्या ठेकेदार व गाव पुढार्यांना बाजूला काढावे असे मत मांडले यावेळी उपसरपंच व ग्रामसेवक यांनी काम बंद करण्याचे सांगून सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी चार वाजता गाव तळ्यात एकत्र येऊन विचार करण्याचे सांगितले व वांगी बुद्रुक ग्रामपंचायत सर्व सदस्य विहीर खोदण्याचा ठिकाणी गाव तळ्यात एकत्र आल्यावर संबंधित ठेकेदार व गाव पुढारी याचा कुठलाही संबंध नाही असे ग्रामसेविका यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत स्वतः हे काम करणार आहे असे स्पष्ट करण्यात आले त्यावेळी चार हजार रुपये तास पोकलेन मशीन साठी देण्यात आला व काम निसार बशीर भाई शेख यांच्याकडून काम करून घेण्याचे सर्वानुमते ठरले. पुढे काम चालु ठेवायचे सर्व सदस्यांना विचारून ग्रामसेविका सौ बाचकर यांनी अधिकृत माहिती दिली