महाराष्ट्रराजकिय

*कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात जाच म्हणजे जायचे ,तंबी आणि प्रशासन लागले कामाला* 

*कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात जाच म्हणजे जायचे ,तंबी आणि प्रशासन लागले कामाला* 

 

*अमरसिंह पंडित सिर्फ नाम ही काफी हैं* 

 

अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. ऊस, कापूस व सोयाबीन यांसारखी नगदी पिके वाहून जाताना उघड्या डोळ्याने पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिक विमा कंपन्यांचे सर्व्हर बंद आहे, शासनाकडून पंचनामे होत नाहीत त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासन विरोधी तिव्र असंतोष आहे. शासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहिर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी अमरसिंह पंडित यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांनी तहसिलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले.तसेच यांची तातडिने दखल घेऊन दिवाळी पर्यंत शेतकरी यांच्या खात्यावर मदत पडेल असा माणस प्रशासनाकडून सरू आहे .

 

सततच्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाच्या पिकाचे पूर्ण नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीनी खरडून वाहून गेल्या आहेत. कापसा सारख्या पिकाला बाजारपेठेत चांगले दर मिळत असताना शेतात अतिवृष्टीमुळे कापूस वाहून चाललेला पहावा लागत आहे. शेतीचे हे चित्र भयावह असताना शासन व्यवस्था मात्र निर्ढावलेली दिसत आहे. पर्जन्यमानाची आकडेवारी सुध्दा अचूकपणे मांडली जात नाही. पिक विमा कंपन्या आणि शासन यांच्यामधील संगणमतामुळे विमाधारक शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही. एैन नुकसानीच्या सूचना देताना पिक विमा कंपनीची वेबसाईट बंद असते, अशिक्षित शेतकरी कंपनीच्या जाचक अटीमुळे नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहे. शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारत असल्याचा आरोप करून शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत न पाहता तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केली.

 

गेवराई शहरातील मुख्य रस्त्यावरून माजी आमदार अमरसिंह पंडित शेकडो पदाधिकाऱ्यांसह शासनविरोधी घोषणा देत तहसिल कार्यालयावर धडकले. तहसिलदार सचिन खाडे आणि तालुका कृषी अधिकारी अभय वरकुटे यांच्याशी त्यांनी या बाबत तहसिल कार्यालयात सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने तहसिलदारांच्या मार्फत सविस्तर लेखी निवेदन यावेळी त्यांनी दिले. याप्रसंगी अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही गावा-गावात विमाधारक शेतकऱ्यांचे फॉर्म भरणे, ऑनलाईन तक्रारी दाखल करणे, नुकसानीचे फोटो काढणे यांसह इतर कामांच्या जबाबदाऱ्या देवून वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी ठणकावून सांगितले.

 

तसेच माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी यावेळी प्नशासनाला धारेवर धरले असल्यामुळे आज सकाळ पासुन गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी तहसिल कार्यलयात सकाळ पासुन तलाठी , मंडळ अधिकारी , कृषी अधिकारी , कृषी साहाय्यक यांची बैठक घेऊन तात्काळ यावर कार्यवाई सुरू झाली असुन दिवाळी पर्यंत शेतकरी यांच्या खात्यावर रक्कम पडेल अश्या हालचाली प्रशानाकडून सुरू झाल्या आहेत .

 

 

 

 

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे