गुरूवर्य अरूणनाथगिरीजी महाराज यांना ” आद्य जगद्गुरु शंकराचार्य ” ही पदवी देण्यात येणार आहे

गुरूवर्य अरूणनाथगिरीजी महाराज यांना ” आद्य जगद्गुरु शंकराचार्य ” ही पदवी देण्यात येणार आहे
सद्गुरू संत श्रेष्ठ नारायणगिरीजी महाराज यांच्या आनंत कृपाशीर्वादाने,ओम चैतन्य अडबंगनाथ यांच्या कृपेनं येत्या,५ मार्च व,६ मार्च २०२२ रोजी मध्य प्रदेश या ठिकाणी,अखिल भारतीय खाटू श्याम श्री महाकाल आखाड्याच्या वतीने,”आद्य जगद्गुरु शंकराचार्य” ही पदवी अडबंगनाथजी संस्थान भामाठान येथील मठाधिपती महंत अरूणनाथगिरीजी महाराज यांना देण्यात येणार आहे .श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण( भामानगर) ता,श्रीरामपूर या ठिकाणी अरूणनाथगिरीजी महाराज यांनी महंत ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अथक प्रयत्नांमुळे काटेरी वृक्षातून नंदनवन निर्माण केले आहे.
वारकरी संप्रदाय निर्माण व्हावा यासाठी संगित विद्यालय निर्माण केले आहे.
अडबंगनाथ संस्थान भामाठान येथे स्वामी अरूणनाथगिरीजी महाराज यांनी भव्य दिव्य अडबंगनाथ संस्थानला वास्तु उभारली आहे.
अडबंगनाथ संस्थान हे प्रगतशील होणे याला कारण अरूणनाथगिरीजी महाराज आधार स्तंभ आहे…
अरूणनाथगिरीजी महाराजांच्या किर्तनातून व प्रवचनातून हिंदू धर्माचा प्रसार ,जनजागृती करणे, वारकरी संप्रदाय वाढवणे अशा सर्व घटकांचा विचार करता अरूणनाथगिरीजी महाराज यांना अखिल भारतीय खाटू श्याम श्री महाकाल आखाड्याच्या वतीने “आद्य जगद्गुरु शंकराचार्य ” ही पदवी देण्यात येणार आहे.