महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणार्‍या निषेधाच्या बोर्डवर काळा झेंडा लावल्याने

टाकळीभान येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असणार्‍या निषेधाच्या बोर्डवर काळा झेंडा लावल्याने टाकळीभान येथील सामाजीक वातावरण तणावपूर्ण झाले होते.

टाकळीभान येथे पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून वाचनालयासाठी ४५ लाखाचा निधी आला होता. या निधीतून येथील मारोती मंदीराजवळील जागेवर वाचनालय उभे करण्याचा निर्णय सर्वपक्षीय पुढार्‍यांनी घेतला होता. त्यानूसार या वाचनालयाच्या कामाचे भूमीपुजनही संपन्न झाले. त्यानंतर या जागेवर वाचनालय होवू नये. ते दुसर्‍या ठिकाणी करावे अशी मागणी निवेदनाद्वारे येथील हिंदूत्ववादी संघटनाकडून ग्रामपंचायतकडे करण्यात आली होती. यावर न थांबता येथील याच लोकांनी काल टाकळीभान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असणारा निषेधाचा बोर्ड लावून त्यावर काळा झेंडा लावला. या गोष्टीने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्याच अनूषंगाने पोलीस प्रशासनाने याची दखल घेत सायंकाळी हे बोर्ड या ठिकाणाहून हटविले. या बोर्डवर काळा झेंडा लावल्यामुळे वातावरण दुषीत होत असतानेच पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत बोर्ड हटविल्याने सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनावधानाने हा बोर्ड संबधिताने लावल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगीतले.

 

 छत्रपती शिवरायांचा फोटो असणार्‍या निषेधाच्या फ्लेक्सवर “अभ्यासिका ही झालीच पाहीजे” पण मंदीराची जागा हडपून नाही. तर इतर ठिकाणी. तसेच असा जुलमी निर्णय घेणार्‍या सत्ताधारी व टाकळीभान ग्रामपंचायतचा जाहीर निषेध. असा मजकुर छापण्यात आला आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे